मुंबई - डोंगरी भागात जुनी इमारत कोसळ्याची घटना घडली आहे. यातील जखमींवर येथील जे.जे. रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.
घटनेतील जखमींना भेटण्यासाठी ते जे.जे. रूग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी जखमींची विचारपूस केली. रूग्णांची काळजी घ्या, अशा सुचना त्यांनी संबंधीत डॉक्टरांनी दिल्या आहेत.