मुंबई : प्रसिद्धी हास्य कलाकार भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या विरोधात नुकतेच एनसीबीने आरोपपत्र (NCB chargesheet against Bharti Singh and Harsh Limbachia) दाखल केले होते. यामध्ये भारती सिंगचा पती हर्ष लिंबाचिया हा अभिनेता सुशांतसिंग राजपूतला ड्रग्स विक्री (selling drugs to Sushant Singh Rajput) करणाऱ्या तस्कराकडून गांजा विकत घेत होता, असा आरोप एनसीबी कडून आरोप पत्रात करण्यात आला आहे. यामुळे भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया च्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. Latest news from Mumbai, Mumbai Crime
एनसीबीच्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती - एनसीबीने आरोप पत्रात म्हटले आहे की, हर्ष लिंबाचिया रिया चक्रवर्तीच्या भावाचा कथित मित्र असलेल्या करमजीत सिंग आनंद याच्याकडून अंमली पदार्थ प्रामुख्याने चरस आणि गांजाचा पुरवठा करत होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात करमजीतच्या अटकेनंतर लिंबाचिया संगीतकार आणि तो ज्या शोचा भाग होता त्या शोच्या नृत्यदिग्दर्शकांद्वारे दुसर्या तस्कराकडे गेला.
आरोपपत्रात दडलेय काय ?
एनसीबीने सप्टेंबरमध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात या जोडप्याविरुद्ध आणि सोमियानारायण नावाच्या संगीतकाराच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. करमजीतच्या अटकेनंतर या जोडप्यासाठी ड्रग्ज विकल्याचा आरोप असलेल्या संगीतकाराने या प्रकरणात अनुमोदक बनण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबई एनसीबीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या आरोप पत्र 200 पानांचे आहे. गेल्या वर्षी 21 नोव्हेंबर रोजी एनसीबीने भारती सिंग आणि तिच्या पतीच्या प्रोडक्शन हाऊसच्या कार्यालयावर आणि निवासस्थानावर छापा टाकून 86.5 ग्रॅम गांजा जप्त केला होता. या जोडप्याला अटक करून दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 23 नोव्हेंबर रोजी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने प्रत्येकी 15,000 रुपयांची सुरक्षा जमा केल्यानंतर या जोडप्याला जामीन मंजूर केला.
भारती आणि हर्षच्या अडचणी वाढण्याची शक्यता - एनसीवीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर आता या प्रकरणातील आरोप निश्चित करण्यात येणार आहे. 6 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणी दरम्यान दोन्ही आरोपींना चारशेचा ताबा घेण्याकरिता हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे लवकरात या प्रकरणात रॉयल कोर्टा सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे भारती सिंग आणि तिचे पती हर्ष लिंबाचिया अडचणी वाढण्याची शक्यता आहे.