ETV Bharat / state

Haji Ali Dargah : हाजी अली दर्ग्यावर हल्ला करणारा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला - हाजी अली दर्गा दहशतवादी हल्ला धमकी

दहशतवादी मुंबईतील हाजी अली दर्ग्यावर (Haji Ali Dargah) हल्ला (terriorist attack) करणार आहेत, असा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला (Mumbai Police Control Room) आला होता. या फोननंतर तारदेव पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत, त्याशिवाय बीडीडीएस, कॉन्व्हेंट व्हॅनही घटनास्थळी दाखल झाली आहे.

Haji Ali Dargah
हाजी अली दर्गा
author img

By

Published : Nov 4, 2022, 3:31 PM IST

मुंबई - दहशतवादी मुंबईतील हाजी अली दर्ग्यावर (Haji Ali Dargah) हल्ला (terriorist attack) करणार आहेत, असा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला (Mumbai Police Control Room) आला होता. या फोननंतर तारदेव पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत, त्याशिवाय बीडीडीएस, कॉन्व्हेंट व्हॅनही घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांच्या टीमने हाजी अली दर्ग्याच्या आत आणि बाहेर कसून तपासणी केली आहे. परंतु, त्यांना तिथे काहीही सापडले नाही.

कॉल करणारा व्यक्ती मानसिक रुग्ण - दरम्यान, ज्या नंबरवरून पोलिसांना फोन आला त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता, त्याचा फोन बंद येत आहे. त्यानंतर तो कोण आहे, कॉल करण्यामागील हेतू काय आहे, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक मदत घेतली असता, कॉलर उल्हासनगर येथील असल्याचे आढळून आले आहे. फोन करणारा हा मानसिक रुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे तारदेव पोलिसांनी सांगितले आहे. काल (३ नोव्हेंबर) दुपारी दोनच्या सुमारास हा फोन आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.