ETV Bharat / state

टेस्लाचे पुढील बिझनेस डेस्टिनेशन गुजरात? जाणून घ्या कारणे

टेस्ला कंपनी 2021 मध्ये भारतात येत असल्याचे, गेल्या वर्षी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते. त्यानंतर टेस्लाने बंगळुरू येथे आपल्या कार्यालयाची नोंदणीही केली आहे. त्यांचा पहिला प्लांट गुजरातमध्ये यावा यासाठी गुजरातचे अधिकारी प्रयत्नात असल्याची माहिती मिळत आहे.

Tesla
टेस्ला
author img

By

Published : Jan 22, 2021, 7:10 AM IST

मुंबई - प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे पुढील बिझनेस डेस्टिनेशन गुजरात असू शकते. गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाचे उच्च अधिकारी व टेस्ला कंपनीचे उच्च अधिकारी सध्या एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. बंगळुरू येथे संशोधन केंद्र स्थापन केल्यानंतर टेस्ला गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह काही राज्यांमध्ये आपले कारखाने उभारण्यासाठी योग्य जागा शोधत आहे.

टेस्लाचे पुढील बिझनेस डेस्टिनेशन गुजरात असू शकते

बंगळुरूमध्ये मुख्य कार्यालय -

टेस्ला कंपनी 2021 मध्ये भारतात येत असल्याचे, गेल्या वर्षी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते. अलीकडेच टेस्लाने कर्नाटकच्या बंगळुरू येथे आपली कंपनी रजिस्टर केली आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकारने टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण दिले होते. परंतु, टेस्लाने आपल्या कंपनीचे अधिकृत कार्यालय बंगळुरू येथे स्थापन केले आहे.

गुजरातचे अधिकारी टेस्लाच्या संपर्कात -

गेल्या काही दिवसांपासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांचे नाव चर्चेत आहे. एलॉन मस्क टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचे मालक आहेत. टाटा, मारुती आणि ह्युंदाई सारख्या वाहन कंपन्यांनंतर आता टेस्ला गुजरातमध्ये येऊ शकते. गुजरात मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आणि उद्योग व खाण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज दास यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात सरकारचे उच्च अधिकारी टेस्ला कंपनीच्या उच्च अधिकायांच्या संपर्कात आहेत. सध्या कंपनी भारतात आपल्या प्लांटसाठी साइट शोधत आहे. ऑटोमोबाईल कंपनीसाठी गुजरात हे सर्वाधिक पसंती असलेले राज्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

गुजरातकडे संसाधनांची उपलब्धता -

24 तास पाणी तसेच विजेची उपलब्धतेशिवाय गुजरातकडे सौरऊर्जा आणि पवन उर्जेचेसुद्धा पुरेसे स्रोत आहेत. हवा, पाणी आणि रस्ते मार्गाने वाहतुकीसाठी गुजरात एक योग्य ठिकाण आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला येत्या दोन वर्षात आपले काही मॉडेल्स भारतात आणणार आहे. कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी मॉडेल-3 आणि प्रीमियम एस प्रीमियम एक्स 2022मध्ये प्रथम भारतात लॉन्च केली जाऊ शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.