मुंबई - राज्यातील मंदिरे भाविकांसाठी दर्शनासाठी ०७ ऑक्टोबर २०२१पासून खुले करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्या अनुषंगाने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन खुले होणार आहे. मंदिर व्यवस्थापनाकडून त्यासंबंधीची पूर्ण तयारी केली गेली आहे. दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून काही नियमावली आखण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने दिलेल्या नियमानुसार केलेल्या दर्शनाची व्यवस्था खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे.
सात तारखेपासून भाविकांसाठी मंदिर खुले होणार असल्याने मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. भाविकांकडून कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जावे यासाठी मंदिर प्रशासनाकडून सुरक्षारक्षक नजर ठेवणार आहे. तसेच मास्क न घालणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच दर्शन झाल्यावर तीर्थप्रसाद दिले जाणार नसल्याचे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.
https://apps.apple.com/in/app/sidhivinayak-temple/id1254939351 आणि https://play.google.com/store/apps/details?id=com.cynapto.ssvt या लिंकवर जाऊन ॲप डाऊनलोड करता येईल. दर गुरूवारी दुपारी १२.०० वाजता न्यासाकडून श्रींच्या दर्शनाकरिता भाविकांसाठी मर्यादित सांकेतिक चिन्ह (QR CODE) खुले करण्यात येतील.
हेही वाचा - 7 ऑक्टोबरपासून साई मंदिर दर्शनासाठी खुले होणार; दररोज 15 हजार भक्तांनाच प्रवेश
मंदिर न्यासातर्फे श्रींच्या दर्शनासाठी ऑनलाईन आरक्षण करावे लागणार आहे. यामाध्यमातून दर तासाला २५० भाविकांना घेता येणार आहे. यासाठी सांकेतिक चिन्ह (QR CODE) भाविकांना आरक्षित (BOOKING) करता येईल. ज्या भाविकांनी ऑनलाईन सांकेतिक चिन्ह (QR CODE) आरक्षण (BOOKING) केले आहे. त्याच भाविकांना श्री दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार.
सिद्धिविनायक टेंपल ॲपद्वारे नोंदणी केलेल्या भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल. दर्शनासाठी येतांना कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. १० वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील वृध्द तसेच गर्भवती महिलांनी शक्यतो दर्शनासाठी प्रवेश करणे टाळावे.
मंदिर प्रशासनाने जारी केलेली नियमावली -
- मंदिरात प्रवेश करतांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील
- योग्य अंतर ठेवावे लागणार (६ फुट – ६ फुट)
- मंदिर परिसरात ६-६ फुटावर स्टीकर बसविण्यात आले आहेत
- मंदिरात प्रवेश केल्यानंतर गर्दी करणे टाळावे
- दर्शनासाठी येतांना सामान, बॅग व लॅपटॉप आणू नये
- हार, फुले, नारळ, पूजेची सामग्री व प्रसाद घेऊन भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही
- मंदिरात दर्शनासाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नियमावली
- भाविकांनी ६ फुटांचे अंतर पाळणे गरजेचे
- प्रत्यकाने मास्कचा वापर करणे बंधनकारक
- हँड सॅनिटायझरने वारंवार हात धुणे
- शिकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड कपड्याने झाकणे आवश्यक असेल
- दर्शन घेत असतांना कोरोनाची लक्षणे आढळल्यास हेल्पलाइनशी संपर्क साधावा
- मंदिर परिसरात थुंकण्यास मनाई असेल