ETV Bharat / state

नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर - नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य सरकारची नियमावली

यंदा कोरोनाची परिस्थिती असल्याने मदत व पुनर्वसन विभागाने 31 डिसेंबर व नववर्षाच्या संदर्भात नागरिकांसाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे, असे म्हटले आहे.

guidelines issued by the state government for new years reception
नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर
author img

By

Published : Dec 28, 2020, 6:28 PM IST

मुंबई - नववर्षाच्या स्वागतासाठी व 31 डिसेंबरला जल्लोषात व मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करून नागरिक उत्साह दाखवत असतात. मात्र, यंदा कोरोनाची परिस्थिती आहे. त्यामुळे सरकार काय सूचना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज मदत व पुनर्वसन विभागाने 31 डिसेंबर व नववर्षाच्या संदर्भात नागरिकांसाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मदत व पुनर्वसन विभागाने आज काढलेल्या परिपत्रकात कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता 31 डिसेंबर व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे, असे म्हटले आहे. तसेच याबाबत मार्गदर्शक सुचनाही जारी केल्या आहे. याआधी 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 या कालावधीत रात्री 11.00 ते सकाळी 6.00 वाजेदरम्यान सरकारने संचारबंदी लागू केली होती.

काय आहेत सरकारकडून सूचना -

1. कोरोनाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर रोजी दिवसभर संचारबंदी नसली, तरीदेखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 1 जानेवारीला नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे

2. 31 डिसेंबर रोजी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे

3. विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्येदेखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते, त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे

4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे

5. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये, तसेच मिरवणुका काढू नये

6. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात

7. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.

8. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

9. तसेच या परिपत्रकानंतर 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, अशा सूचना मदत व पुनर्वसन विभागामार्फत निर्गमित करण्यात आल्या असून नागरिकांनी यांचे पालन करावे, असे आवाहनही मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.

हेही वाचा - ईडीच्या नोटिसीसाठी माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय -संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.