अभिनेत्री अश्विनी भावे यांनी आपल्या सर्व चाहत्यांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत त्यांनी आपला 'लिंबू' कलरच्या साडीमधील एक फोटो देखील शेअर केला आहे.
तुमच्या लाडक्या सेलिब्रेटींचा गुढीपाडवा - सेलिब्रेटी गुढीपाडवा साजरा
13:01 April 13
अश्विनी भावेंनी दिल्या चाहत्यांना शुभेच्छा
12:56 April 13
‘वेल डन बेबी’चा अभिनेता पुष्कर जोगने आपल्या प्रियजनांसोबत साजरा केला ‘सुरक्षित’ गुढीपाडवा!
अभिनेता पुष्कर जोगसाठी हा गुढीपाडवा खास आहे कारण नुकताच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर त्याचा 'वेल डन बेबी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आजच्या या गुढी पाडव्याच्या प्रसंगी आपल्या कुटुंबासमवेत घरीच एक खास आणि सुरक्षित असे डबल-सेलिब्रेशन करत आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पुष्कर आणि चित्रपटाची मुख्य कलाकार अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांनी चाहत्यांना सुरक्षा, आनंद, शांती आणि समृद्धीने भरलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
12:44 April 13
कंगनाने खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
उत्तर भारतात अनेक ठिकाणी आजपासून नऊ दिवस देवींचा उत्सव साजरा केला जातो. अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या ट्विटर अकाऊंटवर काही खास फोटो पोस्ट करून सर्वांना गुढी पाडवा आणि नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एका फोटोमध्ये कंगनाने आपल्या हातात देवीची एक प्रतिमा घेतलेली आहे. हा फोटो आपल्या आईने दिल्या असून हीच देवी तिचे रक्षण करत आहे, असे तिने ट्विटमध्ये सांगितले आहे.
12:39 April 13
पुजा हेगडेने दिल्या सर्वांना उगादीच्या शुभेच्छा
अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया पूजा हेगडेने देखील सर्वांना उगादीच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने आगामी चित्रपट 'आचार्य'चे नवीन पोस्टर शेअर करून या शुभेच्छा दिल्या आहेत.
12:36 April 13
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल्या क्रिकेटमय गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एका खास अंदाजात गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने "आमची अडवली वाट तर ऊभी राहणार तुमची खाट”, असे टि्वटकरून मुंबई इंडियन्सच्या संघाला पांठिबा देत सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
12:31 April 13
आरआरआर चित्रपटाच्या खास पोस्टरसह अजय देवगणने दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
अभिनेता अजय देवगणने देखील आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आरआरआर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करून गुढीपाडवा आणि बैसाखीच्या शुभेच्छा दिल्या. त्याची पत्नी अभिनेत्री काजोलने देखील मराठमोळ्या पोशाखातील एक फोटो पोस्ट करून चाहत्यांना मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या.
12:26 April 13
बीग बी अमिताभ बच्चन यांनी दिल्या शुभेच्छा
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करून देशातील नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी विविध राज्यातील सणांची नावे टाकून ट्वीट केले आहेत. हिंदू नागरिकांप्रमाणेच त्यांनी मुस्लिम बांधवांना देखील रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
12:20 April 13
अक्षय कुमारने दिल्या चाहत्यांना खास शुभेच्छा
अभिनेता अक्षय कुमारने देशभरातील आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने गुढीपाडवा, संवंत्सर, युगादी, उगादी, छेदी चाँद, नवरेह, बैसाखी, नव वर्ष, बिहू, पुथांदू, चैरोबा आणि पना संक्रांतीच्या शुभेच्छा, असे ट्विट केले आहे.
11:50 April 13
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी दिल्या चाहत्यांना शुभेच्छा
मुंबई - मराठी नववर्षाचा पहिला दिवस असणारा गुढीपाढवा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. देशाच्या विविध भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. मात्र, गेल्या वर्षीपासून या सणावर कोरोना सावट आहे. त्यामुळे प्रत्येकजण अगदी साधेपणाने आणि घरातच राहून गुढीपाडवा साजरा करत आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी आपल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.