ETV Bharat / state

कोरोनाच्या रुग्णांसाठी रिलायन्स जिओ कन्व्हेन्शन सेंटरचा विचार; पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती - मुंबई विलगीकरण कक्ष

पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईतील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि इतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाहणी दौरा केला. वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटरची 1 हजार रुग्णांची सोय होऊ शकेल एवढी क्षमता आहे. भविष्यात गरज भासल्यास या सेंटरचा विलगीकरण केंद्र म्हणून विचार करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Guardian Minister Aslam Sheikh
पालकमंत्री अस्लम शेख
author img

By

Published : May 10, 2020, 1:56 PM IST

Updated : May 10, 2020, 4:46 PM IST

मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांच्या विलगीकरणासाठी आवश्यकता भासल्यास वांद्रे-कुर्ला संकुल येथील रिलायन्स जिओ कन्व्हेन्शन सेंटरचा विचार केला जाईल. यासंबंधी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा झाली असल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.

अस्लम शेख यांनी मुंबईतील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि इतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे, पालिका उपायुक्त आणि अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कलिना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि वांद्रे कुर्ला संकुल येथे तयार होत असलेल्या एमएमआरडीएच्या 1 हजार खाटांच्या विलगीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

कोरोनाच्या रुग्णांसाठी रिलायन्स जिओ कन्व्हेन्शन सेंटरचा विचार; पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटरची 1 हजार रुग्णांची सोय होऊ शकेल एवढी क्षमता आहे. भविष्यात गरज भासल्यास या सेंटरचा विलगीकरण केंद्र म्हणून विचार करण्यात येईल. यासंबंधी पालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली आहे, असे शेख यांनी सांगितले.

Last Updated : May 10, 2020, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.