मुंबई : चेंबूर, सहकार नगर आदी म्हाडाच्या ५६ संक्रमण शिबिरांतील रहिवाशांचे रखडलेल्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा ( MHADA transit stalled biometric survey ) फेरनिर्णय महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास (म्हाडा) ( Maharashtra Housing and Area Development Authority ) प्राधिकारणाने घेतला आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल तीन महिन्यांत सादर करावा, अशी सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. बायोमेट्रिक सर्वेक्षणाच्या ग्रीन सिग्नलमुळे संक्रमण शिबिरातील घुसखोरांवर कारवाई करणे सोपे होणार आहे.
आठ हजार घुसखोर - दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक इमारतींमधील दुर्घटनेनंतर त्यातील रहिवाशांना इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी दुरूस्ती मंडळाने ५६ संक्रमण शिबिरे उभारली आहेत. अंदाजे २१ हजार १३५ गाळे या संक्रमण शिबिरांत आहेत. यातील गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आहे. सुमारे आठ हजारांहुन अधिक घुसखोर संक्रमण शिबिरात राहत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून घुसखोरांना काढण्याचे दुरुस्ती मंडळाचे प्रयत्न आहेत. अद्याप त्यांना यश आलेले नाही.
तीन महिन्यांत अहवाल सादर - संक्रमण शिबिरांचा दुरुस्ती मंडळ पुनर्विकास करते. या पार्श्वभूमीवर घुसखोरांना अधिकृत करून त्यांचे पुनर्विकासाअंतर्गत पुनर्वसन करताना पात्रता निश्चिती योग्य प्रकारे व्हावी, किती घुसखोर, किती अधिकृत रहिवासी याची योग्य माहिती असावी यादृष्टीने बायोमेट्रिक सर्वेक्षणाचा करण्याचा निर्णय घेतला आहे. एका खासगी कंपनीला सर्वेक्षणाचा ठेका देण्यात आला आहे. पुढील तीन महिन्यांत ते पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत. सर्वेक्षणानंतर पात्र आणि घुसखोर अशी वर्गवारीच्या सूचनाही दिल्या आहेत.