ETV Bharat / state

येउरमध्ये सलग सहाव्या वर्षी 'ग्रीन गटारी' उपक्रम साजरा - ग्रीन गटारी उपक्रम

गेली काही वर्षे बोरिवली शहराजवळच्या जंगलांमध्ये प्लास्टिक, दारूच्या बाटल्या, थर्मकोलसारखा निसर्गात विघटन न होणारा कचरा आढळत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. ५ वर्षांपुर्वी येऊरच्या जंगलात परिस्थिती गंभीर होती. मात्र, काही पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेऊन जंगलामध्ये मौजमजा करण्याचा प्रकार बंद पाडला आहे.

yeur jungle
येउरमध्ये सलग सहाव्या वर्षी 'ग्रीन गटारी' उपक्रम साजरा
author img

By

Published : Jul 21, 2020, 1:14 PM IST

ठाणे - श्रावण सुरू होण्यापूर्वी आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या अथवा दिव्यांची आरास. हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जातो. बहुतांश लोक पुण्यप्राप्तीसाठी श्रावणात उपवास करतात. त्याआधी शेवटच्या दिवशी मद्यपान आणि मांसाहार करून मन तृप्त करण्याची प्रथा गेल्या काही वर्षात सुरू झाली आहे. याच कारणाने हा दिवस 'गटारी' या नावाने लोकप्रिय आहे. गेले काही वर्ष गटारी साजरी करणे म्हणजे शहराजवळ निसर्गरम्य वातावरणात, जंगल ओढे धबधबे अशा वाहत्या पाण्याजवळ जाऊन दारू पिणे, टोळक्याटोळक्यांनी जाऊन धांगडधिंगा घालणे. परिणामी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, त्याचीच ठाण्याकडील मागची बाजू असलेलं येऊरचं जंगल ह्या अनिष्ट प्रकाराला बळी पडत होतं.

गेली काही वर्षे शहराजवळच्या जंगलांमध्ये प्लास्टिक, दारूच्या बाटल्या, थर्मकोलसारखा निसर्गात विघटन न होणारा कचरा आढळत आहे. त्यामुळे पर्यावरणाची ऱ्हास होत आहे. ५ वर्षांपुर्वी येऊरच्या जंगलात परिस्थिती गंभीर होती. जंगलाजवळ वाढणाऱ्या शहराला कसलाही पायबंद नसल्यामुळे जंगलात मिळेल तिथून लोक आत घुसायचे. आठवड्याच्या शेवटी खाणंपिणं, मौजमजा करायला हक्काचं ठिकाण बनल्याने येऊरच्या जंगलामध्ये जाणाऱ्या प्रत्येक पायवाटेच्या बाजूला, मोकळ्या जागेत खूप प्लास्टिकचा, थर्माकोलचा कचरा जमा व्हायचा.

पावसाळ्याच्या चार महिन्यात तर येऊर परिसरात हुल्लडबाजीला ऊत यायचा. जंगलभर विखुरलेलं प्लास्टिक, दारूच्या बाटल्यांचे तुकडे यामुळे इथल्या वन्यजीवांच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला होता. सरपटणारे जीव या काचांचा शिकार बनत होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणीच काहीच करत नव्हते. हे सगळं पाहून उद्विग्न होऊन वन्यजीव फोटोग्राफी करणाऱ्या काही तरुणांनी येऊरच्या जंगलासाठी सकारात्मक आणि विधायक काम करायला सुरुवात करायची. या उद्देशाने ‘ग्रीन गटारी’ची कल्पना अमलात आणायचे ठरविले. कसलाही पूर्वानुभव नसल्याने समविचारी संघटनांना एकत्र घेत येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या बॅनरखाली स्वच्छता मोहिमेपासून सुरुवात केली. पाच वर्षापूर्वी सुरू केलेली ही ग्रीन गटारी मोहिम याही वर्षी उत्साहाने साजरी केली जाते.

येऊर एन्व्हायरमेंट सोसायटीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर पाच वर्षांनी येऊरच्या जंगलाच्या परिस्थितीत अभूतपूर्व सुधारणा झाली आहे. जंगल परिसरात प्लास्टिक किंवा बाटल्या अभावानेच दिसतात. पोलिसांच्या कारवाईच्या धडाक्यामुळे गटारीनिमित्त जंगलात मौजमजा करायला येणाऱ्या हजारो पर्यटकांची १०० टक्के नाकाबंदी झाली आहे. जंगलात अविघटनशील कचरा जमण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे. पार्टी सारखे प्रकार बंद केल्यामुळे जंगलात पुन्हा एकदा शांतता नांदू लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.