ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणुकांचा यापूर्वीचा कार्यक्रम रद्द, नव्याने जाहीर होणार तारखा - मतदार यादीही रद्द

राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम रद्द केला आहे. आता राज्यातील जवळपास १५०० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नवीन निवडणूक कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

gram panchayat elcation program
ग्रामपंचायत निवडणूक
author img

By

Published : Nov 19, 2020, 7:00 PM IST

मुंबई - राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोरोनामुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी मुंबईत केली.

यापूर्वी १७ मार्चला स्थगिती दिली होती

निवडणुकीबाबत बोलताना मदान म्हणाले, राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020ला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020ला मतदान होणार होते; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 17 मार्च 2020 या दिवशी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तत्पूर्वी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या.

मतदार यादी देखील रद्द-

विधानसभेची ही मतदार यादी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.