ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : रेशन दुकानातून धान्य वाटप... मात्र, शिधापत्रिका नसणारे उपाशीच - धान्य वाटप

राज्यात 21 दिवसांचे लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा ठप्प आहेत. हातावर पोट असणाऱ्यांच्या हाताला काम नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून रेशन दुकानातून धान्य वाटप करण्यात येत आहे.

grain-distribution-from-ration-shop-in-maharastra

author img

By

Published : Apr 11, 2020, 4:52 PM IST

Updated : Apr 11, 2020, 5:41 PM IST

मुंबई- जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात 21 दिवसांचे लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा ठप्प आहेत. हातावर पोट असणाऱ्यांच्या हाताला काम नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात राज्यातील रेशन कार्ड धारकांना अन्न नागरी पुरवठा विभागाकडून रेशन दुकानातून धान्य वाटप करण्यात येत आहे. याचाच आढावा ईटीव्ही भारतच्या ठिकाठिकाणच्या प्रतिनिधींनी घेतला आहे. काही जिल्ह्यात सुरळती वितरण सुरु आहे तर काही ठिकाणी धान्याची कमतरता भासत असल्याचे समोर आले आहे. काय आहे राज्याची स्थिती जाणून घेऊ या रिपोर्टमधून.

सात दिवसात राज्यातील 90 लाख जणांना धान्य वाटप...

लॉकडाऊन काळात अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू असून 1 ते 7 एप्रिल 2020 या सात दिवसात राज्यातील 90 लाख दोन हजार 868 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 22 लाख 83 हजार 180 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी...

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जात आहे. दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रती कार्ड 15 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती कार्ड 20 किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.

grain-distribution-from-ration-shop-in-maharastra
केशरी रेशन कार्ड

तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 2 रु. किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु. किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे 12 लाख 52 हजार 350 क्विंटल गहू, नऊ लाख 75 हजार 144 क्विंटल तांदूळ, तर 11 हजार 503 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे चार लाख 23 हजार 715 स्थलांतरित शिधापत्रिका धारकांनी ते सध्या राहत असलेल्या ठिकाणी पोर्टेबिलिटी योजनेनुसार अन्नधान्य घेतले आहे.

प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त मोफत तांदूळ...

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त मोफत तांदूळ 3 एप्रिलपासून टप्या-टप्याने देण्यात येत आहे. या योजनेसाठी 3 लाख 50 हजार 82 मेट्रीक टन तांदूळ भारतीय खाद्य निगमकडून घेतले जात आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्येही उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

रेशन दुकानांवर धान्याचा तुडवडा...

औरंगाबादसह मराठवाड्यातील काही भागातील रेशन दुकानांवर धान्याचा तुडवडा जाणवत आहे. असे असले तरी प्रशासनाच्या माहितीनुसार लागणाऱ्या धान्यापैकी जास्त धान्यासाठी उपलब्ध असून कोणालाही धान्य कमी पडणार नाही असे सांगितले असल्याने विरोधाभास समोर येत असल्याचे दिसून येत आहे.

देशात लॉकडाऊनच्या काळात गरिबांना रेशन दुकानातून धान्य मिळेल अशी घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात धान्यसाठा संपल्याचे लोकांना ऐकला मिळत आहे. तर धान्यपुरवठा फक्त कार्ड धारकांनाच मिळत असल्याने हातावर पोट असणाऱ्या पण रेशन कार्ड नसणाऱ्या लोकांना उपाशी राहण्याची वेळ येणार आहे.

कोरोनामुळे सर्वत्र काम बंद आहेत. त्यात गरीब आणि हातावर पोट असलेल्या लोकांना अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे नेहमी बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. कारण गरिबांना धान्य उपलब्ध करुन देणाऱ्या रेशन दुकानात अनेक ठिकाणी रेशन उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत आहेत. त्यामुळे गरिबांचा वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त विजय फड यांच्याकडून घेतलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात 11 हजार 441 रेशन दुकान असून 40 मेट्रिक टन अतिरिक्त धान्य साठा उपलब्ध आहे. ज्यामध्ये फक्त रेशन कार्ड धारकांना धान्य वाटप केले जात आहे.

नागरिकांना नियमित दरांमध्ये गहू आणि तांदूळ खरेदी करावा लागत आहे. औरंगाबादमध्ये अंत्योदय व बीपीएल कार्ड धारकांचे रेशनचे गहु 2 रु किलो तर तांदूळ 3 रु किलो दराने देण्यात येत आहे. तर ज्या योजनांमध्ये मोफत ध्यान्य वाटायचे आहे. त्यात पाच किलो तांदूळ प्रतिव्यक्ती देण्यात येत आहे. तर शिव भोजनच्या माध्यमातून मराठवाड्यात 114 केंद्रांच्या माध्यमातून 17 हजार 175 जणांना भोजन दिले जात असल्याची माहिती मिळाली आहे. शासनाकडे असलेल्या माहितीनुसार, सर्व रेशन दुकानात अन्नधान्य साठा उपलब्ध असायला हवा आहे. मात्र, तसे होत नसल्याने, रेशन दुकानात मिळणाऱ्या धान्याचा काळाबाजार तर सुरू नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे.

कार्ड धारकांना धान्य मिळणार...

कोरोना पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील आरोग्य खात्यासोबतच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जबाबदारी अत्यंत महत्वाची असून राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी कामाचा वेग वाढवून अन्नधान्याचे वाटप लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्याचा आढावा घेतला. राज्यातील सर्व जनतेचे लक्ष आपल्या विभागाकडे असून कामात अनियमितता तसेच कुठलीही तक्रार असल्यास विभागाचे नाव बदनाम होईल त्यामुळे आपल्या कामाचा वेग वाढवून कुठलीही तक्रार येणार नाही विभागाची प्रतिमा मलीन होणार नाही असे नियोजन करावे. रेशनिंग, पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह रेशन दुकानदार आपला जीव धोक्यात घालून काम करत असल्यामुळे भुजबळांनी त्यांना धन्यवाद दिले त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांनी एकूण उद्दिष्ठाच्या ८० टक्केपेक्षा अधिकचे धान्य वाटप केले त्या जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे मनपूर्वक अभिनंदन तर राज्यात कमी अन्नधान्याचे वाटप झालेल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी आपले काम चोख बजवावे अशा सूचना यावेळेस दिल्या.

शुक्रवारपासून तांदूळ मोफत...

सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही शिधापत्रिकांमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 3 लाख 92 हजार आहेत. या लाभार्थ्यांना 1 हजार 356 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जात आहे.

तांदूळ

1 ते 6 एप्रिल या सहा दिवसात सांगली जिल्ह्यातील 3 लाख 2 हजार 793 शिधापत्रिका धारकांना तब्बल 7 हजार 240 मे.टन अन्नधान्याचे वाटप केल्‍याची माहिती सांगलीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली. तसेच शुक्रवारपासून तांदूळ मोफत होणार आहे.

तर सहा दिवसात तब्बल 77.22 टक्के कार्डधारकांना अन्नधान्याचे वाटप झाले असून सांगली जिल्‍हा धान्‍य वाटपामध्‍ये राज्‍यात अग्रेसर ठरलेला आहे. कोणत्याही प्रकारचा रेशन दुकानांचा तुटवडा जिल्हात नसून रेशन धान्य दुकानदार हे कार्डधारकांचे दारात सुद्धा जाऊन धान्य वितरित करत आहेत.

गैरप्रकार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई...

जळगाव जिल्ह्यात लाभार्थी नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गैरप्रकार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई देखील सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 1 हजार 937 शासनमान्य स्वस्त धान्य दुकाने आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्येचा विचार करता ती पुरेशी आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या एपीएल शिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्यांच्या कालावधीसाठी सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे. त्यात एपीएल शिधापत्रिकाधारकांना गहू 8 रुपये प्रतिकिलो तर तांदूळ 12 रुपये प्रतिकिलो दराने दिला जात आहे. दरमहा प्रतिव्यक्ती 3 किलो गहू तर 2 किलो तांदूळ असे नियतन सवलतीच्या दरात मंजूर झाले आहे. त्यानुसार शासनाकडून जळगाव जिल्ह्यासाठी गव्हाचा 4 हजार 43 मेट्रीक टन तर तांदळाचा 2 हजार 696 मेट्रीक टन अन्नधान्याचा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा साठा जिल्ह्यातील 3 लाख 12 हजार 649 कार्डधारकांना आगामी 2 महिन्यांच्या काळात वितरित होणार आहे.

धान्य

सवलतीच्या दरात मिळणाऱ्या अन्नधान्याचा लाभ जळगाव जिल्ह्यातील 13 लाख 47 हजार 830 लोकांना होणार आहे, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान, रेशन दुकानदारांकडून होणाऱ्या गैरप्रकाराबाबत नागरिकांकडून थेट जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या जात आहेत. त्याची तत्काळ दखल घेतली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 5 रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले असून यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रावेर तालुक्यातील 3, अमळनेर आणि धरणगाव तालुक्यातील प्रत्येकी 1 अशा 5 रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

लाॅकडाऊनची घोषणा होताच गोर गरीबांमध्ये गोंधळ...

लाॅकडाऊनची घोषणा होताच गोर गरीबांमध्ये गोंधळाची स्थती निर्माण झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारने तीन महिन्यांचे धान्य निशुल्क देण्याची घोषणा केली. नागपूर शहरात 679 स्वस्त धान्याची दुकाने आहेत. त्या दुकानांच्या माध्यमातून धान्य वाटप सुरू झाले आहे. सध्या पुढील 15 दिवस अन्न धान्य पुरेल इतका धान्यसाठा उपलब्ध असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

शहरात एकूण तीन लाख गरीब कुटुंब आहेत ज्याच्या घरातील सदस्यांची संख्या ही १५ लाखांच्या घरात आहे. तर नागपूर जिल्ह्यात एक लाख 23 हजार अंत्योदय शिधापत्रिका धारक आहेत. त्यापकी 46 हजार ग्रामीण भागात राहतात तर उर्वरित 77 हजार अंत्योदय शिधापत्रिका धारक हे शहरी भागात राहत असल्याची नोंद आहे. पुरवठा विभागाच्या माहितीनुसार सध्या साखर, गहू तांदूळ आणि तूरडाळ मिळून 1 लाख 870 मॅट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध असून सर्व रेशन दुकानात तो उपलब्ध करवून देण्यात आला आहे. पुढील काही दिवसात आणखी धान्यसाठा उपलब्ध केला जाणार आहे. ज्यातून पुढील नियोजन केले जाईल.

धान्याचे वितरण सुरळीत सुरू...

पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य दुकांनामधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू असून 1 ते 5 एप्रिल 2020 या पाच दिवसात पुणे पिंपरी-चिंचवड शहरात 1 लाख 93 हजार 624 शिधापत्रिका धारकांना तब्बल 42 हजार 138 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका संख्या 8 हजार 625 व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्या 12 लाख 26 हजार 175 आहे. या लाभार्थ्यांना 760 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेतंर्गत 2 रुपये किलो दराने प्रति कार्ड 15 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रति कार्ड 20 किलो तांदूळ दिला जातो. त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना 2 रुपये किलो प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो.

रेशन दुकानात धान्य वाटप

पोर्टबिलीटी यंत्रणेतंर्गत ऑनलाईन पध्दतीने अन्नधान्य...
पुणे पिंपरी-चिंचवड शहरात या योजनेमधून सुमारे 37 हजार 433 क्विंटल गहू, 2 हजार 448 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात आले आहे. त्याच बरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे 27 हजार 463 (Portability) शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहेत. त्या ठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेतंर्गत ऑनलाईन पध्दतीने अन्नधान्य घेतले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतर्गंत एप्रिल ते जून पर्यत प्रति लाभार्थी प्रति महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशनकार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ 10 एप्रिल पासून कुटूंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध होणार आहे. या योजनेकरीता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम पुणेकडून प्राप्त करुन घेतले. 10 एप्रिल 2020 पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्ये सुध्दा त्या-त्या महिन्यात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

मंत्र्यांच्या जिल्ह्यात धान्य पुरवठा सुरळीत

नाशिक शहरातील 230 स्वस्त धान्य दुकानातून 1 लाख 10 हजार शिधापत्रिका धारकांना सुरळीत धान्य पुरवठा सुरू आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग असल्याने त्यांनी नाशिकवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रति कार्ड 15 किलो गहु 20 किलो तांदूळ आणि एक किलो साखर दिली जात आहे. तर केशरी कार्ड धारकांना 2 रुपये किलो दराने प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जात आहे. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून एप्रिल ते जून पर्यंत प्रति लाभार्थ्यांना प्रति महिना 5 किलो तांदूळ देण्यात येत आहे.
लॉकडाऊन वाढल्यात सरकारला अन्नधान्याच्या पुरवठ्यात आणखी वाढ करावी लागणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले आहे.

Last Updated : Apr 11, 2020, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.