ETV Bharat / state

नवीन महाविद्यालयांच्या मान्यतेचा मार्ग होणार सुकर; राज्य विद्यापीठ कायद्यात होणार सुधारणा - news college proposal

कोरोना प्रार्दुभावामुळे राज्यातील नवीन महाविद्यालयांच्या मान्यतांचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर मार्ग काढण्यााठी राज्य सरकारने 25 जूनला अध्यादेश काढला होता. सोमवारपासू सुरु होणाऱ्या विधिमंडळात विधेयक मांडून विद्यापीठ कायद्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे.

maharshtra legislature
विधीमंडळ
author img

By

Published : Sep 5, 2020, 5:41 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षांमध्ये नव्याने मान्यता मिळालेल्या असंख्य महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष सुरू करता आले नाही. त्यासोबतच अनेक संस्थांना नवीन महाविद्यालयांना मान्यता मिळवण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, आता या सर्व महाविद्यालय आणि संस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात (अधिनियम) सुधारणा केली जाणार आहे. त्याबाबतचे सुधारणा विधेयक सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.

हेही वाचा-सुशांतच्या वांद्रेस्थित घरी सीबीआयचे पथक दाखल; १४ जूनचे करणार 'रिक्रिएशन'

सन 2020 -21 या शैक्षणिक वर्षासाठी विविध संस्था आणि व्यवस्थापनाकडून नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी अहवाल सादर करण्यात आले होते. त्यासाठीची मान्यता मार्च महिन्यापर्यंत दिली जाणार होती. 15 जूनपासून नवीन पाठ्यक्रम, विद्याशाखा आणि अतिरिक्त तुकड्या सुरू करण्याची परवानगी देण्याचे नियोजन होते. परंतु, कोरोनामुळे ही प्रक्रिया थांबली आहे. याविषयी राज्यातील विद्यापीठांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकांमध्ये मान्यतेसाठी आलेले अनुपालन अहवाल, यासाठीची तारीख वाढविण्यात यावी. नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरू करण्यास अंतिम मान्यता देण्याची मुदत आणि त्यासोबत नवीन अभ्यासक्रम, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या सुरू करण्याची परवानगी देण्याची ही तारीख वाढविण्याची शिफारस केली होती.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य विधिमंडळाचे जूनमध्ये होणारे पावसाळी अधिवेशन लांबले होते. त्याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 25 जून 2020 ला एक अध्यादेश जारी करून नवीन महाविद्यालयांच्या मान्यता तुकडीवाढ किंवा परिसंस्था सुरू करण्याच्या संदर्भात तारीख वाढविण्याची तरतूद केली होती. त्यामुळे सोमवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात बदल केले जाणार आहेत. या अधिनियमात कलम 109 च्या पोट-कलम (3 )च्या खंड (च) मधील तरतुदीनुसार 1 मे रोजी अथवा त्यापूर्वी व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेसह राज्य सरकारकडे अहवाल सादर केला गेला तर त्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालय, परिसंस्था सुरू करण्याची परवानगी देण्यात येते. मात्र, राज्यात कोरोनामुळे सर्व शैक्षणिक कामकाज थांबले असल्याने विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे.

विद्यापीठ कायद्यानुसार कलम 109 च्या पोटकलम (4) च्या खंड (घ)मध्ये मधील तरतुदीनुसार राज्य सरकारला शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला 15 जून किंवा त्यापूर्वी नवीन अभ्यास पाठ्यक्रम, विशेष शाखा, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी लागते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही कालमर्यादा आणि त्याचे पालन करणे शक्य झाले नाही. यामुळे पावसाळी अधिवेशनात विद्यापीठ कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. त्यासाठीचे विधेयक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडले जाण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.