ETV Bharat / state

Govind Pansare Murder Case : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्यातील आरोपींविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया थांबू नका; कोल्हापूर सत्र न्यायालयाला निर्देश

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात (Charges fixed against the accused) 9 जानेवारी रोजी आरोपींविरोधात आरोप निश्चित (Charges fixed against the accused) करण्यात येणार आहे. त्यामुळे हत्या प्रकरणातील खटल्याची कारवाई थांबू नका असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High court) आज कोल्हापूर सत्र न्यायालयाला (Kolhapur Session Court) दिले आहे. या प्रकरणात एसआयटीने दाखल केलेल्या आरोप पत्राच्या (ATS charge sheet) आधारेच एटीएसला पुढील कारवाई करण्याचे निर्देश न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने दिले आहे. (Mumbai Crime) या प्रकरणात पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. (Latest news from Mumbai)

author img

By

Published : Jan 6, 2023, 11:04 PM IST

Govind Pansare Murder Case
मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील (Charges fixed against the accused) खटल्याची कारवाई थांबवू नका असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिले आहेत. येत्या 9 जानेवारीपासून या खटल्यातील आरोपींविरोधात आरोप निश्चितीची (Charges fixed against the accused) प्रक्रिया सुरू होणार आहे. इतक्या वर्षांच्या तपासानंतर काही महिन्यांपूर्वीच हा तपास एसआयटीकडून एटीएसकडे दिला आहे. (ATS charge sheet) तेव्हा तातडीने यात नवी माहिती समोर येणे कठीण आहे. त्यामुळे एसआयटीने तयार केलेल्या आरोपपत्राच्या आधारावर उभ्या राहिलेल्या खटल्याची कारवाई सुरू करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High court) जारी केले आहे. (Kolhapur Session Court) 1 फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीत आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दहशतवाद विरोधी पथकाला दिले आहे. (Latest news from Mumbai)

खुनातील हत्यार अद्यापही सापडले नाही : या कटात सामील मारेक-यांच्या हिटलिस्टवर काही ज्येष्ठ पत्रकारांसह सुमारे 40 जणांची नावे होती, अशी माहिती पानसरे कुटुबियांच्या वतीने त्यांचे वकील अभय नेवगी यांनी उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे या कट कारस्थानाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी न्यायालयानं हा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान कोल्हापूर सत्र न्यायालयाने या खटल्याची कारवाई सुरू ठेवावी असे आदेश न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने दिले आहेत. पानसरे तपासातील एसआयटीच्या धिम्या गतीमुळे उच्च न्यायालयाने कुटुंबीयांच्या विनंतीनुसार काही महिन्यांपूर्वी हा तपास एटीएसकडे वर्ग केला गेला आहे. याप्रकरणी वीरेंद्र तावडे आणि समीर गायकवाड यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र एसआयटीने दाखल केलेले आहे. मात्र अद्याप यात वापरलेले हत्यार, मोटारसायकल आणि फरार आरोपी तपास यंत्रणेला सापडलेले नाही.

उच्च न्यायालयाचा प्रश्न : 20 फेब्रुवारी 2015 रोजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पानसरे कुटुबियांच्या वतीने साल 2015 मध्ये दाखल करण्यात आलेली ही याचिका आता का प्रलंबित ठेवावी? असा प्रश्न उच्च न्यायालयाने यावेळी उपस्थित केला. तेव्हा या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखालीच व्हावा अशी मागणी नेवगी यांनी उच्च न्यायालयाकडे केली. अनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील मारेकरी पानसरे खटल्यात साक्षीदार दाखवलेले आहेत. तसेच आतापर्यंत झालेला तपास हा न्यायालयाच्या देखरेखीखालीच झालेला आहे. त्यामुळे या प्रकरणातील खरे सूत्रधार उघड व्हायला होण्यासाठी कोर्टाची मध्यस्थी आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयाकडे केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.