ETV Bharat / state

Look Back 2022 : आक्षेपार्ह विधानांमुळे चर्चेत राहिले राज्यपाल कोश्यारी; वाचा, वादग्रस्त विधाने - भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावर्षी अनेक वादग्रस्त ( Bhagat Singh Koshyari Controversial statements ) विधाने केली आहेत. या वक्तव्याविरोधात राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. अनेक ठिकाणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari 2022 ) यांच्याविरोधात निषेध करण्यात आला. वर्षभरात राज्यपालांनी केलेली वादग्रस्त वक्तव्यांचा आढावा... ( Look Back 2022 )

Look Back 2022
भगतसिंह कोश्यारी
author img

By

Published : Dec 24, 2022, 4:56 PM IST

मुंबई : राज्यपाल हे पद संविधानिक आहे. या पदावरील व्यक्तीने मोजून मापून बोलावे, असे बोलले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी बेताल वक्तव्य ( Bhagat Singh Koshyari Controversial statements ) करण्याचा नवा विक्रम मोडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ), महापुरुषांबाबत सतत वादग्रस्त विधाने केली. राज्यात तीव्र पडसाद उमटले. तसेच आक्षेपार्ह वक्तव्य ( Controversial statements in year ender 2022 ) करुन सतत चर्चेत राहणाऱ्या राज्यपालांची तात्काळ उचलबांगडी करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. महाविकास आघाडीने महामोर्चा काढत तीव्र निषेध नोंदवला. भाजपने मात्र राज्यपालांना आजवर पाठीशी घालण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून येते. वर्षभरात राज्यपालांनी केलेली वादग्रस्त वक्तव्यांचा आढावा...( Look Back 2022 )

  1. मुंबईत पैसा उरणार नाही : मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील दाऊद बाग जंक्शन चौकाचे २९ जुलै राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नामकरण झाले. दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी चौक असे चौकाचे नामकरण करण्यात आले. राज्यपालांनी यावेळी मुंबई-ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढताना मुंबई-ठाण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यावसाय करताना केवळ पैसा कमवला नाही, तर शाळा-महाविद्यालये दवाखाने बांधली आणि गोरगरिबांची सेवा केली. हा समाज देशात तसेच नेपाळ, मॅरिशस आदी देशांमध्ये देखील आहे. जेथे हा समाज जातो, तेथे आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरुप होतो. महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. मुंबईत यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अनेक भागात निषेध नोंदवण्यात आला. राज्यपालांनी यानंतर खुलासा केला. भाजपने मात्र यावेळी चुप्पी साधली होती.
  2. छत्रपती शिवाजी महाराजांना विचारतो कोण? : “चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केले होते. त्यामुळे चांगलेच अडचणीत आले. या वादावर छत्रपती शिवाजी महाराजांवरील आपले विधान प्राथमिक माहितीच्या आधारे होते. आता त्या संबंधी नवीन निष्कर्ष समजल्याचे आणि तोच पुढे नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव केली. पण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी आक्रमक सत्ताधाऱ्यांमुळे विधानभवनातून राज्यपालांना काढता पाय घ्यावा लागला होता.
  3. महात्मा फुले व सावित्रीबाईंबाबत वादग्रस्त विधान : वादग्रस्त विधाने करण्यात राज्यपालांनी मागील वर्षभरापासून रेकॉर्ड मोडला आहे. महापुरुषांना देखील त्यांनी सोडलेले नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. राज्यपाल म्हणाले की, "कल्पना करा की सावित्री बाईंचे लग्न 10 वर्षी झाले, तेव्हा त्यांच्या पतीचे वय हे 13 वर्ष होते. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील? लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील? एक प्रकारे तो कालखंड मूर्तीच्या पुढे फुले वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असे वक्तव्य करुन अकलेचे तारे तोडले होते. राज्यात यानंतर अनेक संघटनांनी आक्रमक होत, राज्यपालांच्या निषेधार्थ जाळपोळ केली होती. भाजपने यावेळी बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले.
  4. नेहरूंबाबत वादग्रस्त वक्तव्य : छत्रपती शिवाजी महाराज, महापुरुषांबाबत वाद ओढवून घेतल्यानंतर राज्यपाल कोश्यारी पुढे शांत होतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मला प्रचंड आदर आहे. पण त्यांची ही एक कमकुवत बाजू होती. ते शांतीदूत आहेत असे त्यांना नेहमी वाटायचे. देशासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या शांतीदूत या प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला आणि हे बराच काळ तो कमकुवत राहिला, असे विधान केले. तसेच अटल बिहारी वाजपेयी सरकार वगळता, नेहरूंपासून त्या आधीचे सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हते. पण वाजपेयींनी अणुचाचणी करून भारताची कणखर प्रतिमा जगाला दाखवल्याचे वादग्रस्त विधान कोश्यारी यांनी केले. त्यावरूनही प्रचंड वादंग निर्माण झाला होता.
  5. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श : राज्यात राज्यपाल पदावर विराजमान झाल्यापासून भगतसिंह कोश्यारी सतत वादात सापडत आले. आता कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वक्तव्य संतापजनकच होते. राज्यपाल म्हणाले की, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे, ते त्या त्या व्यक्तींचे नाव घ्यायचे. मला असे वाटते की जर कुणी तुम्हाला विचारले की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यापासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे विधान केले. या विधानामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते.
  6. राज्यपाल हटावसाठी मोहिम सुरू : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानानंतर राज्यात मोठा वादंग निर्माण झाला होता. आता तर महाविकास आघाडी सह सर्वच विरोधकांनी मोठी आघाडी उघडली. खासदार उदयनराजे, संभाजीराजे यांच्यासह अनेक शिवप्रेमी संघटना राज्यपालांविरोधात आक्रमक झाल्या. 'राज्यपाल हटाव'साठी मोहीम सुरु झाली. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंड राज्यात जाण्याच्या मनस्थितीत आहेत. भाजपच्या पक्षश्रेष्ठींने तशी विनंती सुध्दा केली आहे. परंतु, पक्षश्रेष्ठींकडून सुटका होत नसल्याची खंत राज्यपालांनी बोलून दाखवल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.