मुंबई - राज्यात पूरपरिस्थिती गंभीर असून राज्य सरकारने कागदी घोडे न नाचवता मदत आणि पुर्नवसन कार्याला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर ह्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील पूर परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन धोरण कुचकामी असून दरवर्षी काहीही प्रभावी उपाययोजना केल्या जात नाहीत असा आरोपही वंचितने केला आहे.
सरकारने कागदी घोडे न नाचवता पूरग्रस्तांना मदत करावी - वंचित बहुजन आघाडीची मागणी - maharashtra flood
संभाव्य पूर परिस्थितीचे आकलन करण्यास सरकार आणि राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अपयशी ठरला आहे. पुरात नागरिकाची घरे, शेती, व्यावसायिक साधने, गुरे ढोरे, वाहून गेले किंवा पाण्याखाली गेले आहेत. एकाच पावसाने राज्यातील सुमार दर्जाचे रस्ते, पूल ह्या पूरामुळे पुर्णतः वाहून गेले.
वंचित बहुजन आघाडी