ETV Bharat / state

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईत मदत कक्षाची स्थापना, राज्य सरकारकडूनही मदतीचे आवाहन

महाराष्ट्रात सांगली व कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील पूरग्रस्तांना नागरिकांना मदत करावी, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी व उप जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारनेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री
author img

By

Published : Aug 10, 2019, 3:31 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात सांगली व कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील पूरग्रस्तांना नागरिकांना मदत करावी, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारनेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

मदत कक्षाची यादी
मदत कक्षाची यादी

३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. सांगली व कोल्हापूरला याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. या विभागातील लाखो नागरिकांना एनडीआरएफ, नेव्ही, कोस्ट गार्ड, सैनिकांनी सुरक्षित स्थळी हलवले आहे. या पूरग्रस्तांना आर्थिक, खाद्य पदार्थ, औषधे आदी उपयोगी पडतील, असे साहित्य देऊन मदत करता यावी म्हणून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

उप विभागीय अधिकारी कार्यालय, विद्याविहार, अंधेरी बोरिवली मुलुंड येथील तहसील कार्यालयातही मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. इच्छुक मुंबईकर नागरिकांनी या कार्यालयातील मदत कक्षात आर्थिक, खाद्य पदार्थ, औषधे आदी उपयोगी पडतील अशा साहित्याची मदत करावी. अधिक माहितीसाठी 022 - 26556799, 25111126, 26231368, 28075034, 25602386 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

राज्य सरकारचे मदतीचे आवाहन

पूरग्रस्तांना मदत करता यावी म्हणून राज्य सरकारनेही मदतीचे आवाहन केले आहे. स्टेस्ट बँक ऑफ इंडियाच्या, फोर्ट मुंबई येथील बँकेत खाते क्रमांक 10972433751 आयएफसी कोड क्रमांक SBIN0000300 या खात्यात आर्थिक मदत करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

पूरग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन

महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करता यावी म्हणून मुंबई महानगर पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या ९४ नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन (प्रत्येकी २५ हजार) पूरग्रस्तांना देण्यात यावे, असे पत्र सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आयुक्तांना दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकही पक्षाच्या आदेशानंतर आपले मानधनही पूरग्रस्तांना देणार आहेत.

सामाजिक संघटनांकडूनही मदत

मुंबईमधील सामाजिक संस्थांनीही नागरिकांना पूरग्रस्तांसाठी आर्थिक, खाद्य पदार्थ देण्याचे आवाहन केले आहे. यावर्षी मुंबईत होणारा दहीहंडीच्या सणामधून जमणारी रक्कमही पूरग्रस्तांना दिली जाणार आहे.

राज्य सारकरकडूनही मदतीचे आवाहन
राज्य सरकारकडूनही मदतीचे आवाहन

Intro:मुंबई - महाराष्ट्रात सांगली व कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या विभागातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करावी असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी व उप जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारनेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.Body:3 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. सांगली व कोल्हापूरला याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. या विभागातील लाखो नागरिकांना एनडीआरएफ, नेव्ही, कोस्ट गार्ड, सैनिकांनी सुरक्षित स्थळी हलवले आहे. या पूरग्रस्तांना आर्थिक, खाद्य पदार्थ, औषधे आदी उपयोगी पडतील असे साहित्य देऊन मदत करता यावी म्हणून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

उप विभागीय अधिकारी कार्यालय, विद्याविहार, अंधेरी बोरिवली मुलुंड येथील तहसील कार्यालयातही मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. इच्छुक मुंबईकर नागरिकांनी या कार्यालयातील मदत कक्षात आर्थिक, खाद्य पदार्थ, औषधे आदी उपयोगी पडतील अशा साहित्याची मदत करावी.अधिक माहितीसाठी 022 - 26556799, 25111126, 26231368, 28075034, 25602386 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

राज्य सरकारचे मदतीचे आवाहन -
पूरग्रस्तांना मदत करता यावी म्हणून राज्य सरकारनेही मदतीचे आवाहन केले आहे. स्टेस्ट बँक ऑफ इंडियाच्या, फोर्ट मुंबई येथील बँकेत अकाउंट नंबर 10972433751 आयएफसी कोड नंबर SBIN0000300 या खात्यात आर्थिक मदत करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

पुरग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन -
महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करता यावी म्हणून मुंबई महानगर पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या ९४ नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन (प्रत्येकी २५ हजार) पूरग्रस्तांना देण्यात यावे असे पत्र सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आयुक्तांना दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकही पक्षाच्या आदेशानंतर आपले मानधनही पूरग्रस्तांना देणार आहेत.

सामाजिक संघटनाकडूनही मदत -
मुंबईमधील सामाजिक संस्थानीही नागरिकांना पुरग्रस्तांसाठी आर्थिक, खाद्य पदार्थ देण्याचे आवाहन केले आहे. यावर्षी मुंबईत होणारा दहीहंडीच्या सणामधून जमणारी रक्कमही पूरग्रस्तांना दिली जाणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.