मुंबई : मागील वर्षी जून महिन्यातच शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेल्या पावसामुळे शेतपिकांच्या नुकसानीकरिता सुमारे १५ लाख ५७ हजार ९७१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या बाधित क्षेत्रातील २६ लाख ५० हजार ९५१ शेतकऱ्यांना सरकारने १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मागच्या आठवड्यात १३ जून २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. आता हा निधी तातडीने वितरित करण्यासाठी तसे निर्देश देण्यात आले असून, याबाबतचा शासन निर्णय (जीआर) निर्गमित करण्यात आला आहे.
निधी वितरित करण्यात येणार : याबाबत सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त प्रस्तावांनंतर शेतपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे हा निधी वितरित करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर ८ हजार ५०० रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी १७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २२ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर अशी दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थी :
- अहमदनगर जिल्ह्यातील २ लाख ९२ हजार ७५१ शेतकऱ्यांना सुमारे २४१ कोटी रुपये
- अकोला जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ६५६ शेतकऱ्यांना ८६ कोटी ७२ लाख रुपये
- अमरावती जिल्ह्यातील २ लाख ३ हजार १२१ शेतकऱ्यांना १२९ कोटी ५७ लाख रुपये.
- औरंगाबाद येथील ४ लाख १ हजार ४४६ शेतकऱ्यांना २२६ कोटी ९८ लाख रुपये
- बीड जिल्ह्यातील ४ लाख ३७ हजार ६८८ शेतकऱ्यांना १९५ कोटी 3 लाख रुपये
- बुलढाणा जिल्ह्यातील २ लाख ३८ हजार ३२३ शेतकऱ्यांना ११४ कोटी ९० लाख रुपये
- जळगाव जिल्ह्यातील ६२,८५९ शेतकऱ्यांना ४५ कोटी १४ लाख रुपये
- जालना जिल्ह्यातील २,१४,७९३ शेतकऱ्यांना १३४ कोटी २२ लाख रुपये
- नागपूर जिल्ह्यातील ६,१६१ शेतकऱ्यांना ६ कोटी २३ लाख रुपये
- नाशिक जिल्ह्यातील १ लाख १२ हजार ७४३ शेतकऱ्यांना २५ कोटी ८३ लाख रुपये
- उस्मानाबाद जिल्ह्यातील २,१६,०१३ शेतकऱ्यांना १३७ कोटी ७ लाख रुपये
- परभणी जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार ५१३ शेतकऱ्यांना ७० कोटी ३७ लाख रुपये
- सोलापूर जिल्ह्यातील ४९,१६८ शेतकऱ्यांना ४६ कोटी ८९ लाख रुपये
- वाशिम जिल्ह्यातील ६३ हजार ७१६ शेतकऱ्यांना ३९ कोटी ९८ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
हेही वाचा :
- Consumer Forum Order: विमा कंपनीला ग्राहक मंचाचा दणका; कोविड रुग्णाला ३ लाख ४३ हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश
- Dipak Kesarkar on Farmers Issues : नुकसानग्रस्त भागातील पंचनामे होण्यास विलंब; मंत्री केसरकरांनी सांगितले 'हे' कारण
- Rain Affect Farmers : अवकाळी पावसाने आठ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान, जाचक अटीमुळे शेतकरी मदतीपासून वंचित