मुंबई : गोरेगाव पोलीसांनी (Goregaon police) काल बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड केंद्राचा पर्दाफाश करत एकाला अटक केली आहे. आरुगेशकुमार मिश्रा (४२) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३० आधारकार्ड आणि ७ पॅनकार्डही जप्त करण्यात आली (arrested accused Fake Aadhar card PAN card maker) आहेत.
बनावट कागदपत्रे : पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिश्रा गोरेगाव पश्चिमेकडील प्रेमनगर भागात अनेक वर्षांपासून हे केंद्र चालवत होता. लोकांकडून पैसे उकळून बनावट कागदपत्रे बनवण्यात त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपायुक्त अजय कुमार बन्सल आणि वरिष्ठ निरीक्षक दत्तात्री थोपटे यांच्या देखरेखीखाली एक पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक यांच्या राम वैष्णव यांनी त्यांच्या पथकासह रविवारी या केंद्रावर छापा (Goregaon police arrested accused) टाकला.
गुन्हा दाखल : एका डमी ग्राहकाला पॅन बनवण्यासाठी पाठवण्यात आले. तेव्हा कार्डसाठी आरोपीने १ हजार रुपये घेतले आणि त्याचा फॉर्म भरला. त्यानंतर दहा दिवसांनी दुकानातून कार्ड घेण्यास सांगितले. केंद्रावर छापा टाकला आणि झडतीदरम्यान पोलिसांनी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त केले. अधिकार्यांनी जप्त केलेल्या आधारकार्डांसह नोंदवलेल्या क्रमांकांवर कॉल केला असता, बहुतेक क्रमांक बनावट असल्याचे आढळून आले, असे पोलीस अधिकारी पुढे म्हणाले. या प्रकरणी मिश्रावर कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ व ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करून त्याला कोर्टात हजर केल्यावर पोलिस कोठडी सुनावण्यात (Fake Aadhar card PAN card maker) आली.
फसवा व्यवहार : पोलीसांना संशय आहे की, ऑनलाइन फसवणूक करणारे, बँक खाती उघडण्यासाठी याचा वापर करतात. ज्याचा वापर फसव्या व्यवहारातून पैसे हस्तांतरित करण्यासाठी केला जातो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी मिश्रा याचा अशा कोणत्या टोळीशी संबंध आहे का, याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही पॅनकार्ड विभागाला (Fake PAN card maker) पत्र लिहून मिश्राच्या घराच्या पत्त्यावर केंद्रावर पाठवण्याऐवजी एवढ्या मोठ्या प्रमाणात पॅनकार्ड कसे पाठवले याची माहिती मागवली आहे.