मुंबई - उत्तर मुंबईतील नागरिकांना चांगल्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या रूग्णालयासाठी अंधेरी किंवा दक्षिण मुंबईत जावे लागते. यामुळे उत्तर मुबईतील नागरिकांना नेहमीच सुविधाचा अभाव असतो, तो दूर होण्यासाठी उत्तर मुंबईत एक सुसज्य रूग्णालय व्हावे यासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांनी आंदोलन केले. या आंदोलनासोबतच रक्त दान शीबीराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
या धरणे आंदोलनात खासदार गोपाळ शेट्टींसोबत आमदार अतुल भातखळकर यांच्या समेत उत्तर मुंबई विभागतील भारतीय जनता पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या जागेवर रूग्णालयासाठी भूखंड देण्याचे ठरले असताना सुद्धा येथे रूग्णालय कोण बनवणार यावरून वाद सुरु असून लवकरात लवकर इथे रूग्णालय बनवण्याची मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली. या वेळेस सत्ताधारी सरकार कडून नेहमीच उत्तर मुंबई करांवर अत्याचार होत असल्याचे सांगितले.