ETV Bharat / state

आता कुलब्यावरून थेट कांजूर अन् अंधेरी-वर्सोव्याला पोहचा, मेट्रो 3-मेट्रो 6 मार्ग एकमेकांशी जोडण्याची घोषणा

कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो 3 प्रकल्प आरे कारशेड आणि इतर कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. मात्र, आता हाच प्रकल्प मुंबईकरांसाठी वाहतूक सुविधेच्या दृष्टीने सर्वांत फायद्याचा आणि महत्वाचा प्रकल्प ठरला आहे. कारण आता मेट्रो 3 आणि मेट्रो 6 मार्ग एकमेकांशी जोडण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यांच्या निर्णयाचा मुंबईकरांनी स्वागत केला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Oct 11, 2020, 5:11 PM IST

Updated : Oct 11, 2020, 6:25 PM IST

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो 3 प्रकल्प आरे कारशेड आणि इतर कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. मात्र, आता हाच प्रकल्प मुंबईकरांसाठी वाहतूक सुविधेच्या दृष्टीने सर्वांत फायद्याचा आणि महत्वाचा प्रकल्प ठरला आहे. कारण आता मेट्रो 3 आणि मेट्रो 6 मार्ग एकमेकांशी जोडण्यात आल्याची घोषणा आज (दि.11 ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या घोषणेनुसार आता हे दोन मार्ग जोडले जाणार असून मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर मेट्रोने थेट एकमेकांशी जोडले जाणार आहे. म्हणजेच आता कुलाब्यावरून थेट कांजूरला जात येणार असून कुलाबा ते अंधेरी-वर्सोव्याला पोहचता येणार आहे. त्यामुळे ही मुंबईकरांसाठी मोठी उपलब्धी ठरणार असून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.

बोलताना स्टॅलिन दयानंद
मेट्रो 3 चे कारशेड आरेत बांधण्यात येत होते. पण, याला पर्यावरणप्रेमी आणि आदिवासी यांनी जोरदार विरोध केला होता. यासाठी सेव्ह आरे नावाने एक जनचळवळ उभारली आणि रस्त्यावरच्या लढाईसह न्यायालयीन लढाई लढली. तर आता अखेर महाविकास आघाडीच्या काळात या जनचळवळीला मोठे यश मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांनी अखेर आरेतून कारशेड कंजूरमार्गमध्ये हलवले आहे. तर आरेची 800 एकर जागा संरक्षित केली आहे. त्यानुसार सेव्ह आरे ही मुंबईतील सर्वसामान्यांची पहिली यशस्वी लढाई ठरली आहे.उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता मेट्रो 3 चे कारशेड कांजूरमध्ये बांधण्यात येणार आहे. तर मेट्रो 6 अर्थात स्वामी समर्थ नगर (लोखंडवाला) ते विक्रोळी मार्गाचे कारशेड आणि मेट्रो 3 चे कारशेड एकच असणार आहे. म्हणजेच आता मेट्रो 3 आणि मेट्रो 6 मार्गाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. हे दोन्ही मार्ग आता एकमेकांशी जोडले जाणार असल्याने मुंबईकरांसाठी मोठी उपलब्धी निर्माण होणार आहे. मेट्रो 3 आता कुलाबा-वांद्रे-सीपझ-कांजूरमार्ग अशी होणार आहे. तर मेट्रो 3 आणि मेट्रो 6 एकमेकांना जोडल्याने कुलाब्यावरुन मेट्रो 3 मध्ये बसून तुम्हाला थेट कांजूरला ही जात येणार आहे. तर कुलाबा ते स्वामी समर्थ नगर अर्थात अंधेरी-वर्सोवा (लोखंडवाला) येथेही पोहचता येणार आहे. कुलाब्यावरून मेट्रो 3 चा भुयारी मार्ग आधी आरे मेट्रो स्थानकात येऊन संपणार होता. पण, आता आरेच्या बाहेर जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरून मेट्रो पुढे कांजूरला वळाले तर जेव्हीएएलआरवरून दुसरा मार्ग स्वामी समर्थ नगरला वळेल. म्हणजेच कुलाब्यावरून मुंबईकरांना आता थेट पश्चिम उपनगरला जात येणार तर पूर्व उपनगरात ही थेट पोहचता येणार आहे हे विशेष.सेव्ह आरे चळवळीतील महत्वाचे कार्यकर्ते आणि वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी मुख्यमंत्र्याच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. आरेतून कारशेड कांजूरला हलवत मुख्यमंत्र्यांनी आरे जंगल वाचवले आहेच पण त्याचवेळी मुंबईची वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत केली आहे. आता मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे मेट्रोने जोडली जाणार असून रेल्वे आतापर्यंत हे काम करू शकली नाही ते काम मुख्यमंत्र्यांनी मेट्रो 3 आणि मेट्रो 6 एकत्र करत केले आहे. भविष्यात याचा मुंबईला आणि मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे.जागा आणि पैसा ही वाचला?

मेट्रो 3 साठी आरेत तर मेट्रो 6 साठी कांजूरला कारशेड बांधण्यात येत होता. पण, आता मात्र या दोन्ही मेट्रो मार्गासाठी एकच कारशेड असणार आहे. त्यामुळे आधी दोन कारशेड, त्यासाठी दोन्ही कारशेड मिळून 60 हेक्टर जागा लागणार होती. तिथे आता एकाच ठिकाणी 30 ते 40 हेक्टरमध्ये काम होणार आहे. म्हणजेच जागाही वाचणार तर एकच कारशेड बांधण्यात येणार असल्याने पैसेही वाचणार असल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला आहे.

हेही वाचा - टीआरपी घोटाळा : 'या' आरोपीच्या बँक खात्यात आले होते 1 कोटी

Last Updated : Oct 11, 2020, 6:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.