ETV Bharat / state

Gold Smuggling : सिंगापूरहून भारतात सोन्याची तस्करी? मुंबई विमानतळावर कुटुंबाकडून एक कोटींची सोन्याची पावडर जप्त

Gold Smuggling : एआययूच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटलिजन्स युनिटने सिंगापूरहून प्रवास करणाऱ्या एका भारतीय कुटुंबाकडून सुमारे 1.05 कोटी रुपयांची दोन किलो वजनाची 24 कॅरेट सोन्याची पावडर जप्त केलीय. या कुटुंबाला न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

सिंगापूरहून भारतात सोन्याची तस्करी
Gold Smuggling
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 5:49 PM IST

मुंबई Gold Smuggling : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटलिजन्स युनिटने (सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्ष) सिंगापूरहून प्रवास करणाऱ्या एका भारतीय कुटुंबाकडून सुमारे 1.05 कोटी रुपयांची दोन किलो वजनाची 24 कॅरेट सोन्याची पावडर जप्त केलीय. एआययुच्या अधिकाऱ्यांनी 11 सप्टेंबरला ही कारवाई केली होती. (Gold Smuggling from Singapor)

न्यायालयीन कोठडीत रवानगी : एआययूच्या अधिकाऱ्यांनी 11 सप्टेंबर 2023 ला सिंगापूर ते मुंबई इंडिगो फ्लाइट 6E 1012 द्वारे प्रवास करणार्‍या एका कुटुंबाला मिळालेल्या माहितीनंतर ताब्यात घेतले होते. एक पुरुष, एक महिला आणि दोन वर्ष नऊ महिन्यांचं मूल असं कुटुंब एक कोटींचं सोनं घेऊन येत असल्याची गुप्त माहिती एआययूच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर या कुटुंबास विमानतळावर अटक करण्यात आली होती. या कुटुंबाच्या झडतीत 2 हजार ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट गोल्ड डस्ट म्हणजेच सोन्याची पावडर असलेले चार पाऊच आढळून आले होते. या सोन्याच्या पावडरची किंमत एक कोटी 5 लाख 27 हजार 331 रुपये असल्याची माहिती एआययूच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. यातील एक पुरुष आणि महिला आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

पुणे विमानतळावरही कारवाई : पुणे विमानतळावरही गुप्तांगात लपवून तब्बल ३३ लाखांच्या सोन्याची तस्करी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पुणे विमानतळावर कस्टम विभागाने ही कारवाई केलीय. दुबईहून आलेल्या दोघांनी गुप्तांगात तब्बल ३३ लाख रुपयांच्या सोने असलेल्या कॅप्सूल लपवून आणल्या होत्या. या दोन्ही तस्करांना कस्टम विभागाने अटक केली असून, त्यांच्या जवळील सोनं जप्त केलंय. या पूर्वीही अशा प्रकारच्या तस्करीचा पर्दाफाश सीमा शुल्क विभागाने केलाय.

सीमा शुल्क विभागाची कारवाई : ऑगस्ट महिन्यात मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर चहा पाकिटांमध्ये दीड कोटी रुपयांचे हिरे लपवून आणणाऱ्या व्यक्तीला विमानतळावर पकडण्यात आलं होतं. सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाच्या (एआययू) अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. मुक्कीम रझा अश्रफ मन्सुरी असे अटक आरोपीचे नाव असून तो दक्षिण मुंबईतील रहिवासी आहे. तो दुबईहून मुंबई आला होता. त्याने चहाच्या पाकिटामध्ये ३४ हिरे आणले होते. ते हिरे १५५९.६८ कॅरेटचे असून त्यांची किंमत एक कोटी ४९ लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. त्याला हिऱ्यांच्या तस्करीसाठी पैसे देण्यात येणार होते; पण त्यापूर्वीच त्याला अटक झाली होती.

हेही वाचा :

  1. Gold smuggling: दुबईतून आलेल्या 8 प्रवाशांकडून 3.2 कोटींचे सोने जप्त; मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई
  2. Mumbai Airport Gold Smuggling: मुंबईतील विमानतळावर सोने तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस: साडेतीन किलो सोने जप्त, 11 जणांना अटक
  3. Mumbai Airport Gold Smuggling : कस्टमची मोठी कारवाई; तस्करीचे 1.60 कोटी रुपयांचे सोने मुंबई विमानतळावर जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.