मुंबई : आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. काल मंगळवारी जिथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,330 रुपये होता. आज, बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,360 वर पोहचला आहे. 22 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले तर, 22 कॅरेट सोन्याचा आदल्या दिवशीचा भाव 55,300 रुपये होता. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,250 रुपये आहे.
सोने-चांदी महाग : सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही काळापासून दररोज चढ-उतार होत आहेत. आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव 61 हजार 400 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात आज 3,200 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरात एकाच दिवसात 2 हजार 490 रुपयांनी वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 77 हजार 90 रुपये आहे. दुसरीकडे, आदल्या दिवशी चांदीचा भाव 74 हजार 600 रुपये होता.
सोन्याने नवा उच्चांक गाठला : महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी एक्स्चेंजमध्ये सकाळचे व्यवहार झाले नाहीत, मात्र सायंकाळी एक्सचेंज उघडल्यावर सोन्याने नवा विक्रम नोंदवला. या नवीन विक्रमानंतर सोन्याचा भाव मंगळवारी 60 हजार 954 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. त्यामुळे आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चमकले : देशांतर्गत बाजाराबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव तेजीत आहेत. येथेही सोन्याने प्रति डॉलर २ हजार ४० हा १३ महिन्यांचा उच्चांक ओलांडला आहे. तर, चांदी भाव 25 प्रति डॉलरच्यावर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मार्च २०२२ नंतर प्रथमच सोने २ हजार रुपये प्रति डॉलरवर बंद झाले आहे.
नवा विक्रम प्रस्थापित : सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा तेजी असून दरांनी नवा उच्चांक गाठला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून आज सोन्याच्या भावाने 61 हजारांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बुधवारी सोन्याचा भाव 61,000 रुपये आणि चांदीचा भाव 75,000 रुपयांवर पोहोचला आहे.
हेही वाचा - Budget Session 2023 : संसदेत गोंधळ, राज्यसभेचे कामकाज उद्या 11 वाजेपर्यंत तहकूब