ETV Bharat / state

Gold Smuggling Case Mumbai: सोन्याची पेस्ट करून तस्करी करण्याचा नवा फंडा, मुंबई विमानतळावर गेल्या वर्षभरात ६०० किलो सोने जप्त

कोरोनाने देशभरात थैमान घातलेले असताना विमान वाहतूक बंद होती. त्यामुळे त्यावेळी विमान वाहतुकीबरोबरच सोन्याची तस्करी देखील थंडावली होती. परंतु, कोरोना काळ संपल्यानंतर सोन्याच्या तस्करीनेही उच्चांक गाठला आहे. मुंबई विमानतळावर चालू वर्षांत आतापर्यंत तब्बल ६०४ किलो सोने जप्त करण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. यावरून तस्करीचे प्रमाण अधिक वाढल्याचे स्पष्ट होत आहे. सोन्याची पेस्ट करून तस्करी करण्याचा नवा फंडा स्मग्लरांनी शोधला आहे.

Gold Smuggling Case Mumbai
सोने तस्करी
author img

By

Published : Mar 31, 2023, 8:57 PM IST

सोने तस्करीचे तंत्र समजविताना माजी अधिकारी

मुंबई: गेल्या तीन वर्षांत केलेल्या कारवाईपेक्षा गेल्या वर्षी केलेल्या कारवाईत अधिक सोने जप्त करण्यात आले आहे. तपास यंत्रणांनी मुंबई विमानतळावरून गेल्या तीन वर्षांत ५८१ किलो सोने जप्त केले होते. तर गेल्या वर्षभरात ६०४ किलो सोने जप्त केले आहे. सीमा शुल्क (कस्टम) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तपास यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, २०१९-२०२० या वर्षांत देशात सर्वांत अधिक सोन्याची तस्करीत सोने जप्त करण्याची कारवाई दिल्ली विमानतळावर करण्यात आली होती. त्यावेळी दिल्ली विमानतळावर ४९४ किलो सोने जप्त करण्यात आले होते. दिल्ली पाठोपाठ मुंबई विमानतळाचा नंबर लागत होता.

देशासाठी गोल्ड स्मगलिंग डोकेदुखी: माजी आयपीएस अधिकारी पी. के. जैन यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, भारतामध्ये बऱ्याच दशकापासून सोन्याची स्मगलिंग सुरू आहे. देशांमधून कितीही प्रयत्न झाले तरी सोने दरवर्षी भारतामध्ये अनधिकृतरित्या आयात केले जाते. सोन्याची तस्करी मुख्य करून म्यानमार आणि बांगलादेश मधून केली जात आहे. याआधी काही काळी नेपाल आणि दुबई तसेच खाणीच्या देशामधून समलिंगच्या माध्यमातून सोने भारतात येत असायचे. सध्याच्या घडीलला म्यानमार आणि बांगलादेशातून सोन्याची सर्वाधिक आयात केली जाते. सुमारे 833 कोटी रुपयांच्या सोने भारतात आयात होते. आता यावर्षी या आकडेवारीमध्ये जरी वाढ झाली तरी हा फक्त एक हिमनगाच्या टोक आहे. कारण याच्यापेक्षा कितीतरी पटीने सोने भारतामध्ये अनधिकृतपाने आयात केले जाते आणि आपल्या देशामध्ये खपवला जातो.

स्मगलरला मोठा फायदा: एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने पकडले जाते, त्याअर्थी भारतीय एजन्सी म्हणजे डीआरआय आणि कस्टम्स यांच्या कामगिरीमध्ये भरपूर वाढ झालेली आहे. परंतु याच्या हा पण अर्थ आहे की, भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याची अनाधिकृतरित्या आयात केली जाते. याचे मुख्य कारण भारतामध्ये लावण्यात आलेली इम्पोर्ट ड्युटी आणि जीएसटी. आज १२ टक्के इम्पोर्ट ड्युटी आणि तीन टक्के आयात असा टोटल जवळ 15% च्या फरक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचा भाव आणि भारतामध्ये सोन्याचा भाव त्यांच्यामध्ये जरी जवळजवळ 15 ते 20 टक्के याच्यामध्ये फायदा आहे. इम्पोर्ट किंवा समलिंगी करणाऱ्या माणसाला मोठा फायदा आहे. म्हणून मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये स्मगलिंग होत आहे.

विमान कर्मचाराही दोषी? मुंबई विमानतळावर २०१९-२०२० या अवसरही ४०३ किलो सोने तपस यंत्रणांनी हस्तगत केले होते. मुंबई विमानतळावर २०२० मध्ये ८७ किलो आणि २०२१ मध्ये ९१ किलो सोन्याची जप्ती तपस यंत्रणांनी केली होती. मात्र, गेल्या वर्षी एप्रिलपासून देशातील सर्व व्यवहार पूर्वपदावर आल्यावर विमानसेवा देखील सुरळीत आली. नंतर प्रवासी संख्येने लाखोंचा टप्पा गाठला. दरम्यान, पुन्हा एकदा सोन्याच्या तस्करीमध्ये वाढ होताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सोन्याच्या तस्करीमध्ये गेल्या तीन वर्षांत विमान कंपन्यांच्या कर्मचारांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. गेल्या तीन वर्षांत एकूण ५८ विमान कर्मचाऱ्यांना मुंबई विमानतळावरून सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती.

हेही वाचा: Javed Akhtar : मुलुंड न्यायालयाच्या सुनावणीकडे जावेद अख्तर यांनी फिरवली पाठ, काय आहे प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.