ETV Bharat / state

Goa International Film Festival : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'फिल्म बाजार'साठी 'या' तीन मराठी चित्रपटांची निवड, जाणून घ्या चित्रपटांविषयी!

Goa International Film Festival : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'फिल्म बाजार' विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून तीन मराठी चित्रपटांच्या नावांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही नावं जाहीर केली. या तिन्ही चित्रपटांविषयी आपण जाणून घेऊ या.

Goa International Film Festival
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 9:45 AM IST

Updated : Nov 2, 2023, 12:16 PM IST

मुंबई Goa International Film Festival : यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'फिल्म बाजार' विभागासाठी राज्य शासनाकडून 'ग्लोबल आडगाव', 'गिरकी' आणि 'बटरफ्लाय' या तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी केली. या तीनही चित्रपटाच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीला गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं प्रायोजकत्व मिळणार आहे.

दरवर्षी गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'फिल्म बाजार' या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्याकरिता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीनं केलेल्या शिफारसीनुसार 'ग्लोबल आडगाव', 'गिरकी' आणि 'बटरफ्लाय' हे तीन चित्रपट निवडण्यात आले आहेत.

२९ चित्रपटांचे प्रस्ताव : शासनानं महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जाहिरातीद्वारे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फिल्म बाजार' या विभागात राज्य सरकारकडून पाठविण्याकरता इच्छुक चित्रपटांचे प्रवेश मागविले होते. त्यानुसार एकूण २९ चित्रपटांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. समीर आठल्ये, किशोरी शहाणे, प्रसाद नामजोशी, हर्षित अभिराज आणि संदीप पाटील यांच्या समितीनं परीक्षणाअंती 'ग्लोबल आडगाव', 'गिरकी' आणि 'बटरफ्लाय' या तीन चित्रपटांची निवड केली. दरम्यान, गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'फिल्म बाजार' विभागासाठी निवडण्यात आलेल्या तिन्ही चित्रपटांविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ या.

ग्लोबल आडगाव : 'ग्लोबल आडगाव' या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिलकुमार साळवे यांनी केलंय. सिल्व्हर ओक फिल्म अ‍ॅन्ड इंटरटेनमेंट प्रस्तुत मनोज कदमव यांची निर्मिती असलेला 'ग्लोबल आडगाव' हा चित्रपट शेती आणि संघर्ष यांच्याभोवती फिरतो. आदर्श शिंदे, गणेश चंदनशिवे आणि जसराज जोशी यांनी यातली गाणी गायली आहेत. चित्रपटात अभिनेता सयाजी शिंदे , उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, अनिल नगरकर, सिद्धी काळे, शिवकांता सुतार आदींच्या प्रमुख भूमिका आहेत.

गिरकी : 'गिरकी' हा ९५ मिनिटं लांबीचा चित्रपट असून, त्याच्या लेखन व दिग्दर्शनाची बाजू युवा दिग्दर्शिका कविता दातीर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे निर्माते गणेश शिंदे, कविता दातीर असून चित्रपटात सुयश झुंझूरके आणि प्रमिती नरके या दोघांच्यात प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. एका निबीड जंगलात अडकलेला तरुण-तरुणी एकमेकांना अपघाताने भेटतात. जंगलातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात दोघांच्या मनाच्या तारा जुळतात, असं वाटतं. पण... एका सामाजिक विषयावर टोकदार भाष्य करणाऱ्या या चित्रपटासाठी सारंग कुलकर्णी यांनी संगीत दिग्दर्शन केलंय.

बटरफ्लाय : मीरा वेलणकर यांनी दिग्दर्शित केलेला आणि असीम एंटरटेनमेंट आणि अ‍ॅप्रोग्राम स्टुडिओ निर्मित 'बटरफ्लाय'मध्ये मधुरा वेलणकर, अभिजीत साटम, प्रदीप वेलणकर, महेश मांजरेकर, सोनिया परचुरे, राधा धारणे अशी दिग्गज नट मंडळी आहेत. 'भारी फिलिंग देणारा आणि आयुष्याला लख लख लायटिंग करणारा सिनेमा' अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. चित्रपट स्त्रीप्रधान विषयावरचा असला तरी सर्व वयोगटाच्या पुरुष-महिलांना नात्यांच्या नव्या बाजूची ओळख करुन देण्याचं काम हा चित्रपट करतो.

हेही वाचा -

  1. विक्रम गोखलेंची शेवटची भूमिका असलेल्या 'सूर लागू दे' चित्रपटाचं नवं पोस्टर लॉन्च!
  2. Dunki Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवसाला 'डंकी'चा टीझर होईल प्रदर्शित....
  3. Kali Peeli Taxi : हिंदी चित्रपटसृष्टीतील काळी पिवळी टॅक्सीवर आधारित 'या' चित्रपटांबद्दल जाणून घ्या ; टॉप सहा चित्रपट...

Last Updated : Nov 2, 2023, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.