ETV Bharat / state

Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात घेणार उद्योगपतींच्या भेटी

author img

By

Published : Jan 4, 2023, 9:49 AM IST

Updated : Jan 5, 2023, 9:37 AM IST

योगी आदित्यनाथ 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर ( Yogi Adityanath Visit Mumbai  ) आहेत. ग्लोबल इन्वेस्टर समिटमध्ये सहभागी होण्यासाठी ते मुंबईत येणार ( Global Investor Summit Mumbai ) आहेत. या दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूकासाठी योगींचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील बड्या उद्योजक, व्यावसायिकांशी योगी आदित्यनाथ संवाद साधणार ( Yogi Adityanath Interact with business professionals ) आहेत.

yogi aditynath
योगी आदित्यनाथ

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार ( Yogi Adityanath Visit Mumbai ) आहेत. या दोन दिवसाच्या दौऱ्यात मुंबईत होणाऱ्या ग्लोबल इन्वेस्टर समिटमध्ये ते सहभागी होणार आहेत. या समिटमध्ये सामील होणाऱ्या वेगवेगळ्या व्यवसायिक आणि उद्योगपतींसोबत त्यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ते २७ जानेवारीपासून देशाच्या जवळपास नऊ मोठ्या शहरांमध्ये ग्लोबल इन्वेस्टर समिटचा रोडशो होणार ( Global Investor Summit Roadshow ) आहे.

उद्योजक, व्यावसायिकांशी संवाद : या रोडशोचे उद्घाटन मुंबईतून होणार आहे. या कार्यक्रमासाठी योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेश हे बीमारू राज्य म्हणून ओळखले जायचे मात्र या राज्याची कमान योगी आदित्यनाथ यांच्या हाती आल्यानंतर राज्य विकासाच्या मार्गावर चालू लागला आहे. उद्योजकांसाठी उत्तर प्रदेश राज्य हे अनुकूल झाले असून जास्तीत जास्त उद्योगपतींनी व्यवसायिकांनी उत्तर प्रदेश राज्यात गुंतवणूक करावी यासाठी योगी आदित्यनाथ वेगवेगळ्या उद्योजक व्यावसायिकांशी संवाद साधणार ( Yogi Adityanath Interact with business professionals ) आहेत. तसेच या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दादर येथील सिद्धिविनायक मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर येथे दर्शन घ्यायला जाणार असल्याची देखील माहिती आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ग्लोबल इन्वेस्टर समिट : ४ जानेवारीला दुपारी योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून विमानाने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. मुंबईत आल्यानंतर सायंकाळी ते मुंबईतील काही उत्तर प्रदेशमधील महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी घेणार आहेत. यासोबतच बॉलीवूडमधील काही कलाकार निर्माते दिग्दर्शक यांच्याही गाठीभेटी त्यांच्या या दौऱ्यामध्ये नियोजित आहेत. या भेटीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये तयार करण्यात येणाऱ्या फिल्म सिटी बाबतते ( Uttar Pradesh Film City ) या कलाकार निर्माता दिग्दर्शक यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. तर तेथेच ५ जानेवारीला टाटा ग्रुप रिलायन्स ग्रुप आदित्य बिर्ला ग्रुप, महिंद्रा ग्रुप गोदरेज ग्रुप अशा नामांकित समूहाच्या प्रतिनिधींशी योगी आदित्यनाथ भेट घेणार आहेत. ग्लोबल इन्वेस्टर समिट उत्तर प्रदेशमध्ये १० ते १२ जानेवारीला लखनऊ येथे होणार आहे. त्यावेळी या सर्व उद्योजकांना उत्तर प्रदेशमध्ये येण्याचे आमंत्रणही त्यांच्याकडून दिले ( Global Investor Summit Uttar Pradesh ) जाईल.

Last Updated : Jan 5, 2023, 9:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.