मुंबई - मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात राहता येणार नाही, असा सज्जड इशारा देणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणौतवर टीका केली आहे.
मुंबई किंवा महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकार 'वाय' सुरक्षा देत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. सर्व पक्षांनी याचा निषेध केला पाहिजे, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
हेही वाचा- जनतेचा उद्रेक होण्याआधी मागण्या मान्य करा; राज ठाकरेंचा अदानी कंपनीच्या सीइओंना इशारा