ETV Bharat / state

सेवा बजावताना मृत्युमुखी पडलेल्या कोविड योद्ध्यांना शहिदाचा दर्जा द्या- प्रवीण दरेकर

मृत कोविड योद्धा हा कुटुंबातील कमवती व्यक्ती असते. तीच गमावल्याने त्या कुटुंबातील एका सदस्याला संबंधित मृत व्यक्तीच्या ठिकाणी शासकीय नोकरीत सामावून घेण्याची विनंती दरेकर यांनी केली. तसेच, कोरोनामुळे मृत्यू झालेले पत्रकार पांडुरंग रायकर यांना ५० लाखाचा विमा द्या, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
author img

By

Published : Sep 7, 2020, 5:52 PM IST

Updated : Sep 7, 2020, 6:38 PM IST

मुंबई - कोरोना काळात सेवा देताना मृत्युमुखी पडलेले डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार या कोविड योद्ध्यांना शहिदाचा दर्जा द्यावा. तसेच, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी बोलताना केली.

माहिती देताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या शोक प्रस्तावावर संवेदना मांडताना दरेकर यांनी ही मागणी केली. काहीही चूक नसताना, कोरोनाग्रस्तांना सेवा देताना, मदत करताना ज्यांचे निधन झाले, असे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस बांधव आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आले आहे. त्यांना शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली.

मृत कोविड योद्धा हा कुटुंबातील कमवती व्यक्ती असते. तीच गमावल्याने त्या कुटुंबातील एका सदस्याला संबंधित मृत व्यक्तीच्या ठिकाणी शासकीय नोकरीत सामावून घेण्याची विनंती दरेकर यांनी केली. तसेच, कोरोनामुळे मृत्यू झालेले पत्रकार पांडुरंग रायकर यांना ५० लाखाचा विमा द्या, अशी मागणीही दरेकर यांनी केली.

हेही वाचा- कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका' कार्यालयाची पालिका अधिकाऱ्यांकडून तपासणी

Last Updated : Sep 7, 2020, 6:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.