मुंबई - केंद्रीय गृहमंत्रालयाने 6 जीबी पेन ड्राइव्ह आणि संबंधित दस्तएवज मुंबई सायबर सेलकडे 10 दिवसात सोपवण्याचे आदेश किला न्यायालयाने दिले आहेत. आज मंगळवार हे आदेश देण्यात आले आहेत. ( Kila Court over Rashmi Shukla Phone Tapping Case )
काय आहे प्रकरण?
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कथित आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगचा आरोप करत केंद्रीय गृह मंत्रालयला 6 जीबी पेनड्राईव्ह ड्राइव्ह आणि काही कागदपत्रे दिली होती. मात्र, या प्रकरणात मुंबई सायबर सेलतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची चौकशी मुंबई सायबर सेल करत आहे. या प्रकरणात चौकशी कामासाठी सदर पेन ड्राईव्ह आणि दस्तेवज राज्य सरकारतर्फे केंद्राकडून मागण्यात आले होते. मात्र, केंद्राकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने राज्य सरकारतर्फे किला न्यायालयात धाव घेण्यात आली होती.
हेही वाचा - Rashmi Shukla Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणातील FIR रद्द करण्याची शुक्लांची याचिका फेटाळली
दोन्ही पक्षाचा युक्तिवाद एकल्यानंतर न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी आदेश राखीव ठेवला होता. आज मुंबई सायबर सेल ऑफिशियल सीक्रेट अॅक्टनुसार वरीष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी किला न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला. केंद्रीय गृहमंत्रालयाने 6 जीबी पेन ड्राइव्ह आणि संबंधित दस्तएवज मुंबई सायबर सेलकडे 10 दिवसात सोपवण्याचे आदेश किला न्यायालयाने दिले आहेत. अतिरिक्त महानगरीय दंडाधिकारी सुधीर भाजीपाले यांनी हा आदेश दिला आहे.