मुंबई- सरकारने शिधापत्रिका धारकांना ३ महिन्यांचे धान्य मोफत देण्याचा पहिला आदेश आणि नंतर राज्य शासनाने त्या-त्या महिन्याचे शिजलेले धान्य देण्याचा आदेश यामुळे राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने ३ महिन्यांचे धान्य मोफत देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत, त्याप्रमाणे कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
कोरोना संकटामुळे लॉकडाऊन झालेल्या जनतेला राज्यातील व केंद्रातील सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारने ३ महिन्यांचे अन्नधान्य रेशन दुकानावर मोफत उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, कोणालाही याचा लाभ मिळाला नाही. राशन द्यायला सुरुवात झाली आहे, परंतु लोकांकडून पैसे घेतल्या जात आहे. त्यामुळे, राज्य सरकारमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. तसेच ज्यांचाकडे शिधापत्रिका नसेल त्यांना आधारकार्डावर रेशन द्यावे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा- संचारबंदीत दारूचे गोडाऊन फोडणाऱ्या चोरट्यांना अटक