ETV Bharat / state

चौकशीसाठी 14 दिवसांचा वेळ द्या - प्रताप सरनाईक यांची ईडीकडे मागणी

आपल्याला आपला पक्ष ठेवण्यासाठी काही कागदपत्रांची जुळवाजुळव करायची आहे. चौकशीदरम्यान, आपला पक्ष मजबुतीने ठेवण्याची संधी मिळावी, म्हणून आपणास 14 दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी या मेलमध्ये करण्यात आली आहे.

pratap sarnaik
प्रताप सरनाईक
author img

By

Published : Dec 4, 2020, 5:53 PM IST

मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणासंदर्भात चौकशी होणार आहे. यासाठी ईडीकडून सरनाईक यांना तब्बल 3 वेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, समन्स बजावल्यानंतरही प्रताप सरनाईक चौकशीसाठी हजर झाले नाहीत. यानंतर प्रताप सरनाईक यांच्या लीगल टीमकडून ईडीला मेल करण्यात आला आहे. या मेलच्या माध्यमातून ईडीने चौकशीसाठी 14 दिवसांचा वेळ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकशी दरम्यान बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी मागितला वेळ -

आपल्याला आपला पक्ष ठेवण्यासाठी काही कागदपत्रांची जुळवाजुळव करायची आहे. चौकशीदरम्यान, आपला पक्ष मजबुतीने ठेवण्याची संधी मिळावी, म्हणून आपणास 14 दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी या मेलमध्ये करण्यात आली आहे. मात्र, सरनाईक यांच्या लीगल टीमकडून आलेल्या मेलला ईडीकडून अद्याप कुठलेही उत्तर देण्यात आलेले नाही.

हेही वाचा - पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक : "चंद्रकांत दादांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारला पाहिजे"

पत्नी आजारी असल्याने वेळ मिळावा म्हणून विहंग सरणाईकची मागणी -

तर, दुसरीकडे प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक याला ईडीकडून चौकशीसाठी चार वेळा समन्स बजावण्यात आलेल आहे. मात्र, विहंग सरनाईक यांनी त्यांची पत्नी आजारी असल्यामुळे वेळ वाढवून मागितलेला आहे. सोमवारपर्यंत आपण कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर होऊ, असे विहंग यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे. तर विहंग यांच्या मागणीला अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली आहे.

विहंग सरनाईक ईडी प्रकरण

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुंबई व ठाण्यातील घरावर 'ईडी'च्या पथकाने छापेमारी केल्यानंतर या संदर्भात सरनाईक यांचा मुलगा विहंग यास तब्बल 5 तास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर विहंग सरनाईक यास सोडण्यात आले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.