ETV Bharat / state

दादर : दारूच्या व्यसनामुळे लग्नास नकार दिल्याने तरुणीवर प्रियकराकडून चाकूहल्ला - दादर तेजस खोबरेकर न्यूज

दादरमध्ये राहणाऱ्या रुचिता हडकर या तरुणीचे तेजस खोबरेकर या तरुणासोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लवकरच हे दोघे लग्न करणार होते. मात्र, तेजस खोबरेकर याला दारूचे व्यसन जडले. या गोष्टीवरून या दोघांमध्ये नेहमी खटके उडत होते. तेजसच्या दारूच्या व्यसनामुळे त्याचे वागणे बदलले होते. त्याच्याकडून रुचिता हिला सतत मारहाण सुद्धा केली जात होती. या गोष्टीला कंटाळलेल्या रुचिताने त्याच्यासोबत प्रेमसंबंध संपवण्याचे ठरवून त्यास यापुढे आपण भेटणार नसल्याचे कळवले होते.

दादर तरुणीवर चाकूहल्ला न्यूज
दादर तरुणीवर चाकूहल्ला न्यूज
author img

By

Published : Nov 17, 2020, 12:21 PM IST

मुंबई - मुंबईतील दादर परिसरात एका 25 वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला करणाऱ्या युवकाला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. मुंबईतील दादर परिसरामध्ये रुचिता हडकर या तरुणीवर तिचा प्रियकर तेजस खोबरेकर (28) याने 14 नोव्हेंबरला चाकू हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. यानंतर पोलीस पळून गेलेल्या आरोपीच्या मागावर होते. दरम्यान, पोलिसांना पाहून आरोपीने स्वतःलासुद्धा चाकूने जखमी करून घेतल्याची घटना घडलेली आहे.

दारूच्या व्यसनामुळे दोघांमध्ये उडत होते खटके

मुंबई दादर परिसरात राहणाऱ्या रुचिता हडकर या तरुणीचे तेजस खोबरेकर याच्यासोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लवकरच हे दोघे लग्न सुद्धा करणार होते. मात्र, तेजस खोबरेकर याला दारूचे व्यसन जडले. या गोष्टीवरून या दोघांमध्ये नेहमी खटके उडत होते. तेजसच्या दारूच्या व्यसनामुळे त्याचे वागणे बदलले होते. तेजसकडून रुचिता हिला सतत मारहाण सुद्धा केली जात होती. या गोष्टीला कंटाळलेल्या रुचिताने त्याच्यासोबत प्रेमसंबंध संपवण्याचे ठरवून त्यास यापुढे आपण भेटणार नसल्याचे कळवले होते. मात्र, यानंतरही तेजस रुचिताला सतत फोन करून त्रास देत होता. गेल्या काही महिन्यांपासून रुचिताने तेजसचे फोन घेणे बंद केले होते. मात्र तेजसने रुचिताला दिवाळीच्या पहिल्या दिवशी भेटण्याची विनंती करत यानंतर पुन्हा कधी भेटणार नसल्याचे तिला सांगितले होते. त्यानुसार, 14 नोव्हेंबरला रुचिता तेजसला दादर परिसरामध्ये सकाळी 11 वाजता भेटली होती.

हेही वाचा - जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाच जणांना अटक; एक लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्‍त

अटक टाळण्यासाठी आरोपीने स्वतःला चाकूने केले जखमी

दादर परिसरातील घाणेकर रोडवर भेटल्यानंतर तेजसने रुचिताला पुन्हा शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळेस रुचिताने येथून निघून जाण्याचा प्रयत्न केला असता तिचा पाठलाग करून तेजसने तिला जमिनीवर पाडले व स्वतःकडच्या चाकूने तिच्या मानेवर व हातावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. यानंतर घटनास्थळावरून तेजसने पळ काढल्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांनी जखमी रुचिता हिला उपचारासाठी केईएम रुग्णालयामध्ये दाखल केले. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या बहिणीकडूच्या जबानीवरून तेजसचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून तेजस हा दादर परिसरातील कीर्ती महाविद्यालय जवळ असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तेजसला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस येत असल्याचे पाहून स्वतःची अटक टाळण्यासाठी तेजस ने स्वतःवर चाकूने वार करून घेण्यास सुरुवात केली. मात्र , पोलिसांनी तेजसला अडवून ताब्यात घेतले. जखमी झालेल्या तेजसला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून उपचारासाठी दाखल केलेल्या तेजसवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवलेला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तेजस खोबरेकर या आरोपीला या प्रकरणात अटक केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - अट्टल चोरट्यांकडून चेन स्नॅचिंगसह जबरी चोरीचे 6 गुन्हे उघडकीस; कराडच्या गुन्हे शाखेची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.