ETV Bharat / state

प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून, सुटकेसमध्ये आढळले होते अवयव

पोलिसांना समुद्रकिनारी आढळून आलेल्या सुटकेसमध्ये काही कपडे सुद्धा मिळाले होते. या कपड्यांवर अलमो मेन्स वेअर अशा नावाचा टेलर मार्क आढळून आला. या अनुषंगाने पोलिसांनी कुर्ला परिसरातील टेलरकडे चौकशी केली.

प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून
प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून
author img

By

Published : Dec 7, 2019, 7:55 PM IST

मुंबई - माहीम परिसरातील मगदूम शहा बाबा दर्ग्याच्या पाठीमागे असलेल्या समुद्रकिनारी 2 डिसेंबर रोजी एका सुटकेस आढळली होती. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीचे हात-पाय आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. या गुन्ह्यात खून झालेल्या व्यक्तीचे बेनेट रिबेलो नाव असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय दत्तक मुलीला व तिच्या 16 वर्षाच्या अल्पवयीन प्रियकराला अटक केली आहे.

प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून

असा लागला छडा -

पोलिसांना समुद्रकिनारी आढळून आलेल्या सुटकेसमध्ये काही कपडे सुद्धा मिळाले होते. या कपड्यांवर अलमो मेन्स वेअर अशा नावाचा टेलर मार्क आढळून आला. या अनुषंगाने पोलिसांनी कुर्ला परिसरातील टेलरकडे चौकशी केली. टेलरकडील पावती पुस्तकांचे बारकाईने बारकाईने परीक्षण केले असता, एका बिल पुस्तकांमधील कपड्याचा नमुना सुटकेसमध्ये सापडलेल्या शर्ट सोबत मिळून आला. या संदर्भात पोलिसांनी आयुब नावाच्या युवकाची चौकशी केली असता त्याच्याकडे सुटकेसमधील मिळता-जुळता शर्ट आढळून आला.

हेही वाचा - बेळगाव सीमाप्रश्न : मुख्यमंत्र्याकडून दोन-समन्वयक मंत्र्याची नियुक्ती, प्रत्येक महिन्याला आढावा बैठक

आयुबचा या खूनाशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी पुन्हा चौकशी केली. तेव्हा आणखी एका पावती पुस्तकात त्याच कलरच्या कापडाचा नमुना व बेनेट नाव आढळून आले. केवळ एक हात, एक पाय व गुप्तांग आढळून आल्याने पोलिसांकडे मृत व्यक्तीची ओळख करणे कठीण होते. मात्र, पोलिसांनी मयत व्यक्तीचे फेसबुक प्रोफाईल पहिले त्यावेळी बेनेट रिबेलो नावाच्या व्यक्तीचे फेसबूकवरील स्वाक्षरी असलेला फोटो व पावती पुस्तकावरील स्वाक्षरी मिळून आली. यावरून सुटकेस मधील अवयव हे बेनेट रिबेलो याचेच असल्याचे तपासात समोर आले.

दत्तक मुलीचे करत होता लैंगिक शोषण -

दोन वर्षापूर्वी बेनेट रिबेलो याने एका मुलीला दत्तक घेतले होते. या मुलीचे वाकोला परिसरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध होते. या गोष्टीला बेनेट रिबेलोचा विरोध होता. तर बेनेट रिबेला हा मुलीचे काही महिन्यांपासून लैंगिक शोषण करत होता. त्यावेळी बेनेट हा 26 नोव्हेंबरला घरात एकटा असताना मुलगी व तिच्या प्रियकराने लाकडी बांबूने मारहाण करत व चाकूने वार करून बेनेटला जखमी केले. मात्र, बेनेट याचा जीव जात नसल्याचे मुलीने त्याच्या तोंडात विषारी औषध मारले.

हेही वाचा - मुंबईत मागील 9 वर्षात शून्य एन्काऊंटर; 'या' गँगच्या गुंडाचा केला होता शेवटचा खात्मा

तब्बल 3 दिवस करत होते मृत शरीराचे तुकडे -

बेनेट याचा खून केल्यावर दोन्ही आरोपी तब्बल 3 दिवस त्याच घरात मृतदेहाजवळ बसून होते. या दरम्यान या दोघांनी सूरी गरम करून बेनेटच्या शरीराचे तुकडे केले. ते सुटकेसमध्ये भरून मिठी नदीत टाकत होते. पोलिसांनी सुरवातीला मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. मात्र, पोलिसांचा खाक्या दाखविल्यावर तिने तिचा गुन्हा कबुल केला.

Intro:मुंबईतील माहीम परिसरातील मगदूम शहा बाबा दर्गा च्या पाठीमागे असलेल्या समुद्रकिनारी दोन डिसेंबर रोजी एका सुटकेसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा एक हात एक पाय बघता का आठवण आल्यामुळे खळबळ माजली होती या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांच्या युनिट 5 कडे करण्यात आला होता . या खुनाचा छडा पोलिसांनी लावला असून या संदर्भात बेनेट रिबेलो या व्यक्तीचा खून करणाऱ्या त्याच्या 19 वर्षीय दत्तक मुलीला व तिच्या 16 वर्षाच्या अल्पवयीन प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. Body:असा लागला छडा

पोलिसांच्या समुद्रकिनारी आढळून आलेल्या सुटकेसमध्ये महत्त्वाच्या वयासोबत काही कपडे सुद्धा मिळाले होते. या कपड्यांवर अलमो मेन्स वेअर अशा नावाचा टेलर मार्क आढळून आल्यामुळे या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता संबंधित कुर्ला परिसरातील टेलर कडे चौकशी करण्यात आली. टेलर कडील पावती पुस्तकांचे बारकाईने बारकाईने परीक्षण केले असता एका बिल पुस्तकांमधील कपड्याचा नमुना सुटकेसमध्ये सापडलेल्या शर्ट सोबत मिळून आला. या संदर्भात पोलिसांनी आयुब नावाच्या युवकाची चौकशी केली असता त्याच्याकडे सुटकेस मधील मिळता जुळता शर्ट आढळून आला. आयुबचा या खुनाशी संबंध नासल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी पुन्हा चौकशी केली असता आणखीन एका पावती पुस्तकात त्याच कलरचा कापडाचा नमुना व बेनेट नाव आढळून आले. केवळ एक हात , एक पाय व गुप्तांग आढळून आल्याने पोलिसांकडे मयत व्यक्तीची ओळख करणे कठीण होते. मात्र पोलिसांनी मयत व्यक्तीचा फेसबुक प्रोफाईल पहिला असता बेनेट रिबेलो नावाच्या व्यक्तीचा फेसबुक प्रोफाईलवरील स्वाक्षरी असलेला फोटो व पावती पुस्तकावरील स्वाक्षरी मिळून आली. यावरून सुटकेस मधील अवयव हे बेनेट रिबेलो याचेच असल्याचे तपासात समोर आले.
Conclusion:दत्तक घेतलेल्या मुलीच करीत होता लैंगिक शोषण

दोन वर्षापूर्वी बेनेट रिबेलो याने आराध्या जितेंद्र पाटील (19) या मुलीला दत्तक घेतले होते. मात्र आराध्या हिचे वाकोला परिसरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध होते. या गोष्टीला मयत बेनेट रिबेलो(59) ह्याचा विरोध होता. आरोपी आराध्या हिच्या जबाणीत गेल्या काही महिन्यांपासून मयत बेनेट रिबेलो हा तिचे लैंगिक शोषण करीत होता. बेनेट याला 26 नौव्हेंबर रोजी घरात एकटा असताना आराध्या व तिच्या प्रियकराने लाकडी बांबू मारहाण करीत व चाकूने वार करून जखमी केले होते. मात्र बेनेट याचा जीव जात नसल्याचे कळताच आराध्या हिने त्याच्या तोंडात बेगॉन स्प्रे हे विषारी औषध सुद्धा मारले होते.

तब्बल 3 दिवस मृत शरीराचे करीत होते तुकडे

बेनेट याचा खून केल्यावर दोन्ही आरोपी तब्बल 3 दिवस त्याच घरात मृतदेहाजवळ बसून होते. या दरम्यान या दोघांनी सूरी गरम करून बेनेट च्या शरीराचे तुकडे करून ते सुटकेस मध्ये भरून मिठी नदीत टाकत होते. पोलिसांनी सुरवातीला आराध्या हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ती उडवाउडवीची उत्तरे देत होती.मात्र पोलिसांचा खाक्या दाखविल्यावर तिने तिचा गुन्हा कबुल केला आहे. पोलीस या प्रकरणी मयत बेनेट रिबेलो याच्या इतर अवयवांचा शोध घेत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.