ETV Bharat / state

50 वर्षाच्या नराधमानं 13 वर्षाच्या बालिकेला म्हटलं 'हॉट'; न्यायालयानं ठोठावली तीन वर्षाची शिक्षा - बालिकेला चुकीचा स्पर्श

Girl Abused In Mumbai : मुंबईत 13 वर्षाच्या बालिकेला 50 वर्षाच्या नराधमानं छेडछाड करुन अश्लील कृत्य केलं. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष पोक्सो न्यायालयानं या प्रकरणी नराधमाला 3 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

Girl Abused In Mumbai
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 3:35 PM IST

Updated : Dec 17, 2023, 3:41 PM IST

मुंबई Girl Abused In Mumbai : मित्र-मैत्रिणींसोबत घराजवळ उभ्या असलेल्या 13 वर्षाच्या बालिकेला चुकीचा स्पर्श करत अश्लील शब्द वापरल्यानं एका 50 वर्षाच्या नराधमाला न्यायालयानं 3 वर्षाची शिक्षा ठोठावली. ही घटना मुंबईत 24 मे 2016 मध्ये घडली होती. घटनेनंतर पीडित बालिका शाळेत न गेल्यानं ही बाब उघड झाली होती. त्यामुळं पीडितेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी नराधमावर पोक्सो कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

छेडछाड झाल्यानंतर पीडिता गेली नाही शाळेत : मुंबईत 24 मे 2016 या दिवशी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास तेरा वर्षाची बालिका आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत घराजवळ उभी होती. त्यावेळेला पन्नास वर्षाचा नराधम तिच्या बाजूनं आला. त्यानं बालिकेला चुकीचा स्पर्श करत अश्लील संवाद केला. त्यामुळं घडलेल्या प्रकारानं बालिका भेदरली. या प्रकारानंतर पीडिता शाळेत गेलीच नाही. तिनं आपल्या नातेवाईकांना देखील याबाबत सांगितलं. नातेवाईकांनी त्या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यामुळं नराधमावर गुन्हा देखील नोंदवण्यात आला.

शिकवणीस गेल्यावर नराधमानं केला पाठलाग : 50 वर्षाच्या नराधमानं छेडछाड केल्याची माहिती पीडितेनं नातेवाईकांना दिली. मात्र, त्यानंतरही हा नराधम पीडित बालिकेची छेडछाड करत राहिला. पीडिता शिकवणीस गेल्यानंतर तिचा पाठलाग करत त्यानं तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं पीडितेनं ही बाब तिच्या मामाला सांगितली.

भांडणाचा राग काढत असल्याचा नराधमाचा दावा : पीडित बालिकेच्या तक्रारीवरुन नराधमाच्या विरोधात पोक्सो कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. त्यामुळं पोलिसांनी नराधमाला अटक केली. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळं नराधम मोकाट सुटला. हा खटला विशेष पोक्सो न्यायालयात दाखल झाला. वस्तीमध्ये नळाच्या पाण्यावरुन भांडण झाले होते. त्या भांडणांचा राग म्हणून त्याला गुंतवलं जात असल्याचा दावा नराधमाच्या वकिलांनी यावेळी न्यायालयात केला. पीडिता खोटं बोलत असल्याचा दावाही यावेळी नराधमाच्या वतीनं करण्यात आला.

पोक्सो न्यायालयानं ठोठावली शिक्षा : पीडितेला छेडछाड करुन नराधमानं भांडणाच्या रागातून आरोप होत असल्याचा दावा केला होता. मात्र विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश कल्पना पाटील यांनी आरोपीचा बचाव नाकारला. पीडित 13 वर्षाच्या बालिकेची साक्ष महत्वाची ठरली. पीडितेनं तिच्या आजीजवळ देखील याबाबत सांगितलं होतं. ही माहिती उलट तपासणीमध्ये पुढं आली. त्यामुळं पोक्सो न्यायालयानं 50 वर्षाच्या नराधमाला तीन वर्षाची शिक्षा सुनावली. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास यांनी सांगितलं, की न्यायालयाचा निर्णय स्तुत्य आहे. परंतु पोलिसांनी वेळीच त्याच्या मुसक्या आवळायला हव्या होत्या. अशा पुरुषांना जामीन देणं चुकीचं आहे. अन्यथा इतर अनेक लहान मुलींवर असे आरोपी अत्याचार करू शकतात.

हेही वाचा :

  1. गावगुंडाचं क्रौर्य, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दिले सिगारेटचे चटके; मुंडणही केलं
  2. Titwala Rape : टिटवाळा रेल्वेस्थानकाजवळ विवाहितेवर बलात्कार, एकाला अटक
  3. मेक्सिकन 'डीजे'वर बलात्कार करुन अनैसर्गिक अत्याचार; वांद्रे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Last Updated : Dec 17, 2023, 3:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.