ETV Bharat / state

दुष्काळाबाबत सरकार  गंभीर, प्रत्येक मंत्री दुष्काळी दौऱ्यावर - गिरीश महाजन - cm

दुष्काळ निवारणासाठी जे काही करता येईल ते करण्याची सरकारची तयारी आहेस, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई येथे बोलताना सांगितले.

गिरीश महाजन
author img

By

Published : May 13, 2019, 9:58 PM IST

मुंबई- दुष्काळाबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. आमचा प्रत्येक मंत्री दुष्काळी भागाला भेटी देत आहे. स्वतः मुख्यमंत्री सरपंच, तलाठी यांच्याशी बोलून आढावा घेत आहेत. दुष्काळाची तीव्रता खूप मोठी असून मराठवाड्यात साडे चार टक्के पाणी शिल्लक आहे, त्यावरून त्याची दाहकता दिसून येते. दुष्काळ निवारणासाठी जे काही करता येईल ते करण्याची सरकारची तयारी आहेस, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई येथे बोलताना सांगितले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी मराठा आरक्षणाचा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार आणि राज्यातील एक ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी महाजन यांची भेट घेतली होती. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि दुष्काळ संबंधी चर्चा केली. या चर्चेत राधाकृष्ण विखेपाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. वैद्यकीय प्रवेशातील तांत्रिक अडचणीबाबत त्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्री वैद्यकीय प्रवेशाबाबतीत अतिशय गंभीर आहेत, असे महाजन यावेळी म्हणाले.

कमल हसन यांना तपासण्याची गरज

कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता, असे विधान केले आहे. याविषयी महाजन यांना विचारले असता, कमल हसन यांना तपासण्याची गरज आहे. हे विधान त्यांनी कधी केले हे तपासावे लागेल. त्यांच्या विधानाला काहीही आधार नाही. मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्यामार्फत त्यांची तपासणी करावी लागेल, अशी टीकाही महाजन यांनी केली.

Intro:मुंबई ।

दुष्काळाबाबत सरकार अतिशय गंभीर आहे. आमचा प्रत्येक मंत्री दुष्काळी भागाला भेटी देत आहे. चर्चा करत आहेत. स्वतः मुख्यमंत्री सरपंच, तलाठी यांच्याशी बोलून आढावा घेत आहेत. दुष्काळ निवारणासाठी जे काही करता येईल ते करण्याची सरकारची तयारी आहे. दुष्काळाची तीव्रता खूप मोठी आहे. आज मराठवाड्यात साडे चार टक्के पाणी शिल्लक आहे, त्यावरून त्याची दाहकता दिसून येते, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.Body:पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी मराठा आरक्षणाचा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार आणि राज्यातील एक ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी महाजन यांची भेट घेतली होती. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि दुष्काळ संबंधी चर्चा केली.

या चर्चेत राधाकृष्ण विखेपाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही. वैद्यकीय प्रवेशातील तांत्रिक अडचणीबाबत त्यांनी चर्चा केली. मुख्यमंत्री वैद्यकीय प्रवेशाबाबतीत अतिशय गंभीर आहेत, असे महाजन म्हणाले.

कमल हसन यांना तपासण्याची गरज आहे. हे विधान त्यांनी सकाळी केले. दुपारी केलंय की रात्री हे ही तपासावे लागेल. त्यांच्या विधानाला काहीही आधार नाही.मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्याकडून त्यांची तपासणी करावी लागेल, अशी टीकाही महाजन यांनी केली. कमल हसन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता, असे विधान केले, त्याला महाजन यांनी उत्तर दिले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.