ETV Bharat / state

बेस्टला सक्षम करण्यासाठी महाव्यवस्थापकांचा ऍक्शन प्लान, बेस्टची वाहतूक करणार सक्षम

मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन म्हणून बेस्टची ओळख आहे. सध्या आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला रुळावर आणण्यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी पदभार स्वीकारताच ऍक्शन प्लॅन तयार करण्याचा विचार मांडला आहे.

बेस्टला सक्षम करण्यासाठी महाव्यवस्थापकांचा ऍक्शन प्लान

author img

By

Published : Jun 6, 2021, 1:02 AM IST

मुंबई - मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन म्हणून बेस्टची ओळख आहे. सध्या आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला रुळावर आणण्यासाठी बस्टचे नवनियुक्त महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी पदभार स्वीकारताच ऍक्शन प्लॅन तयार करण्याचा विचार मांडला आहे. त्यानुसार बेस्टची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे, प्रवासी संख्येत वाढ करणे, आदी उपाययोजनांवर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

उत्पन्नाचे स्रोत वाढवणार

बेस्ट उपक्रमाचे तत्कालीन महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांची दिल्ली येथे बदली झाली. त्यानंतर बेस्ट उपक्रमाला आता नवीन महाव्यवस्थापक मिळाले आहेत. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी आज कुलाबा येथील बेस्ट भवनमध्ये वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन, बेस्टच्या वाहतूक प्रवर्तन प्रणाली विषयी माहिती जाणून घेतली. यानंतर उपक्रमाची वाहतूक सेवा अधिकाधिक सक्षम करून, जास्तीत जास्त प्रवाशांना याचा लाभ कसा करून देता येईल, यावर त्यांनी चर्चा केली.
यावेळी प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनेही काय करता येईल यावरही त्यांनी प्रकाश टाकला. तसेच, प्रवासी उत्पन्नाच्या व्यतिरिक्त अन्य प्रकारे उत्पन्नाचे स्त्रोत कसे निर्माण करता येऊ शकतात, याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेशही चंद्रा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे सध्याच्या काळातील आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या आणि आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीकोनातून योजना तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

डबल डेकर बसची वयोमर्यादा संपली

बेस्ट उपक्रमात १२० डबल डेकर बसेस असून, त्या बसेसची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. मात्र, मुंबईची डबलडेकर शान आहे. ही डबलडेकर कायम रहावी. तसेच, पर्यावरणाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक बसेस घेण्यावर बेस्ट उपक्रमाचा भर आहे. या बस अधिकाधिक वाढवत प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याबाबतही चंद्रा यांनी बेस्ट उपक्रमातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.