ETV Bharat / state

जिलेटीनच्या कांड्या सचिन वाझेने केल्या होत्या खरेदी - मुंबई जिल्हा बातमी

राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या चौकशी नुसार अँटिलिया या इमारतीच्या बाहेर सापडलेल्या मोटारीतील जिलेटिनच्या कांड्या या स्वतः सचिन वाझेने विकत घेतलेल्या होत्या, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या सुत्रांकडून समजली आहे.

जिलेटीन कांड्या
जिलेटीन कांड्या
author img

By

Published : Apr 1, 2021, 11:35 AM IST

Updated : Apr 1, 2021, 3:41 PM IST

मुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या चौकशी नुसार अँटिलिया या इमारतीच्या बाहेर सापडलेल्या मोटारीतील जिलेटिनच्या कांड्या या स्वतः सचिन वाझेने विकत घेतलेल्या होत्या, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या सुत्रांकडून समजली आहे. मात्र, याच जिलेटिनच्या कांड्या त्याने कधी व कुठून विकत घेतल्या होत्या याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. या जिलेटीन कांड्या नागपूरमधील सोलर इंडस्ट्रीज कंपनीने बनवलेल्या असल्याचे यापूर्वीच समोर आलेले होते.

जिलेटीन कांड्या
जिलेटीन कांड्या

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील मोटारीत सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) तपास करत आहे. यातील मुख्य आरोपी म्हणून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यास अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत.

जिलेटीन कांड्या
जिलेटीन कांड्या
जिलेटीनच्या कांड्याच्या बॉक्सचा शोध

जिलेटिनच्या कांड्या या स्कॉर्पिओ गाडी सापडलेल्या आहेत त्या जिलेटिनच्या कांड्या एका बॉक्समध्ये होत्या. त्या बॉक्सचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणा घेत आहे . राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रानुसार जिलेटिनच्या कांड्यांचा त्या बॉक्सवर एक विशेष 'क्यू आर कोड' असून हा क्यू आर कोड जर राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाला तर जिलेटिनच्या कांड्या या केव्हा विकण्यात आल्या होत्या व त्या कोणी विकल्या याचा छडा लावणे सोपे जाणार आहे.

दरम्यान , नागपूर मधील जिलेटीनच्या कांड्या बनवनाऱ्या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून बोलवले जाण्याची शक्यता आहे. त्यांचा जबाब घेतला जाणार असून या अगोदर नागपूर पोलिसांनी या कंपनीच्या संचालकांच्या जबाब नोंदवून घेतलेला आहे.

आतापर्यंत 8 गाड्या जप्त

राष्ट्रीय तपास यंत्रणेने या दरम्यान आतापर्यंत सचिन वाझें हा वापरत असलेल्या 8 गाड्या जप्त केल्या आहेत. 15 मार्च रोजी इनोव्हा कार मुंबईतून जप्त करण्यात आली होती . तर ब्लॅक मर्सिडीज ही 16 मार्च रोजी क्रॉफर्ड मार्केट येथून जप्त करण्यात आली होती. तर 18 मार्च रोजी ब्लु कलरची मर्सिडीज ठाण्यातून जप्त करण्यात आली होती. 22 मार्च रोजी व्होल्वो कंपनीची गाडी एटीएसकडून जप्त करण्यात आली आहे. 30 मार्च रोजी नवी मुंबईतील कामोठे येथून आऊट लेंडर ही गाडी जप्त करण्यात आली होती तर 31 मार्च रोजी वसई-विरार परिसरांमधून ऑडी ही गाडी जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा - रश्मी ठाकरेंच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी मोदींचा उध्दव ठाकरेंना फोन

Last Updated : Apr 1, 2021, 3:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.