ETV Bharat / state

मुंबईतील 'ही' उद्याने राहणार आता २४ तास खुली, पालिका प्रशासनाचा निर्णय - उद्यान

यापुढे मुंबईतील २४ उद्याने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पर्यावरण आरोग्याच्यादृष्टीने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महापालिका
author img

By

Published : Sep 10, 2019, 8:08 AM IST

मुंबई - महापालिकेची उद्याने सायंकाळी ७ ते ८ वाजता बंद ठेवण्यात येत होती. मात्र, यापुढे २४ उद्याने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पर्यावरण आरोग्याच्यादृष्टीने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा - कुंभारीतील विडी कामगारांच्या गृहनिर्माण संस्थांना अकृष‍िक आकारणीतून सूट

मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात सुमारे ७५० उद्याने आहेत. या उद्यानांचा सकारात्मक परिणाम जसा पर्यावरणाच्या दृष्टीने आहे, तसा तो आरोग्याच्यादृष्टीने आहे. मात्र, महापालिकेच्या उद्यान खात्याच्या अखत्यारितील उद्याने खुल्या राहण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. तर काही उद्यानांची सायंकाळी बंद होण्याची वेळ ७ ते ८ च्या दरम्यानची होती. त्यामुळे मुंबईकर नागरिकांना हवा तसा उपयोग होत नव्हता. या सर्व बाबी लक्षात घेऊन ही उद्याने २४ तास खुली ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अखत्यारितील जागांचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित वेळांचे वेळापत्रक उद्यानांच्या प्रवेशद्वाराजवळ लावले जाणार असल्याची माहिती पालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

हेही वाचा - एमआयएमसोबत आमची युती कायम - अॅड. प्रकाश आंबेडकर

ही उद्याने खुली राहणार -

शहर विभाग -

ए विभागातील कुपरेज बॅण्डस्टॅण्ड उद्यान, सी विभागातील भगवानदास तोडी उद्यान, डी विभागातील टाटा उद्यान, ई विभागातील अब्दुला बरेलिया उद्यान, एफ उत्तर विभागातील महेश्वरी उद्यान, एफ दक्षिण विभागातील बिंदू माधव ठाकरे उद्यान, जी दक्षिण विभागातील आद्य शंकराचार्य उद्यान, जी उत्तर विभागातील आजी आजोबा उद्यान

पूर्व व पश्चिम उपनगर -

एच पूर्व विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, एच पश्चिम विभागातील रावसाहेब पटवर्धन उद्यान, के पूर्व विभागातील श्री. साईलीला मनोरंजन मैदान, के पश्चिम विभागातील कमलाकरपंत वालावलकर मनोरंजन मैदान, पी दक्षिण विभागातील वेदप्रकाश चड्ढा उद्यान, पी उत्तर विभागातील स्वतंत्रता उद्यान, आर दक्षिण विभागातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यान, आर मध्य विभागातील गांजावाला उद्यान, आर उत्तर विभागातील जरी मरी उद्यान, एल विभागातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, एम पूर्व विभागातील बिंदू माधव ठाकरे मनोरंजन मैदान, एम पश्चिम विभागातील डी. के. संधू उद्यान, एन विभागातील डॉ. केशव बळीराम हेडगेवार उद्यान, एस विभागातील शहीद जयवंत हनुमंत पाटील मनोरंजन उद्यान आणि टी विभागातील लाला तुळशीराम उद्यान

Intro:Mumbai - मुंबई महापालिकेची उद्याने सायंकाळी ७ ते ८ वाजता बंद ठेवण्यात येत होती. मात्र यापुढे २४ उद्याने २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पर्यावरण आरोग्याच्यादृष्टीने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.Body:मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात सुमारे ७५० उद्याने आहेत. या उद्यानांचा सकारात्मक परिणाम जसा पर्यावरणाच्या दृष्टीने आहे, तसा तो आरोग्याच्यादृष्टीने आहे. मात्र महापालिकेची उद्यान खात्याच्या अखत्यारितील उद्याने खुल्या राहण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. तर काही उद्यानांची सायंकाळी बंद होण्याची वेळ ७ ते ८ च्या दरम्यानची होती. त्यामुळे मुंबईकर नागरिकांना हवा तसा उपयोग होत नव्हता. या सर्व बाबी लक्षात घेऊन ही उद्याने २४ तास खुली ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अखत्यारितील जागांचा नागरिकांना अधिकाधिक उपयोग व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित वेळांचे वेळापत्रक उद्यानांच्या प्रवेशद्वाराजवळ लावले जाणार असल्याटी माहिती पालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
.....
ही उद्याने खुली राहणार -
शहर विभाग --
ए विभागातील कुपरेज बॅण्डस्टॅण्ड उद्यान, सी विभागातील भगवानदास तोडी उद्यान, डी विभागातील टाटा उदयान, ई विभागातील अब्दुला बरेलिया उद्यान, एफ उत्तर विभागातील महेश्वरी उद्यान, एफ दक्षिण विभागातील बिंदू माधव ठाकरे उद्यान, जी दक्षिण विभागातील आद्य शंकराचार्य उद्यान, जी उत्तर विभागातील आजी आजोबा उद्यान
....
पूर्व व पश्चिम उपनगर -
एच पूर्व विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, एच पश्चिम विभागातील रावसाहेब पटवर्धन उद्यान, के पूर्व विभागातील श्री. साईलीला मनोरंजन मैदान, के पश्चिम विभागातील कमलाकरपंत वालावलकर मनोरंजन मैदान, पी दक्षिण विभागातील वेदप्रकाश चड्ढा उद्यान, पी उत्तर विभागातील स्वतंत्रता उद्यान, आर दक्षिण विभागातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यान, आर मध्य विभागातील गांजावाला उद्यान, आर उत्तर विभागातील जरी मरी उद्यान, एल विभागातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, एम पूर्व विभागातील बिंदू माधव ठाकरे मनोरंजन मैदान, एम पश्चिम विभागातील डी. के. संधू उद्यान, एन विभागातील डॉ. केशव बळीराम हेडगेवार उद्यान, एस विभागातील शहीद जयवंत हनुमंत पाटील मनोरंजन उद्यान आणि टी विभागातील लाला तुळशीराम उद्यान

बातमीसाठी पालिकेचा फोटो वापरावा Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.