मुंबई - महाराष्ट्रसह मुंबईत गेल्या 10 दिवसांपासून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाची सांगता आज होत आहे. गणपती बाप्पाचे आज अनंत चतुर्थीला विसर्जन केले जात आहे. शहरातून वाजत-गाजत मिरवणुका काढून बाप्पांना निरोप दिला जात आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने मुंबईसह गिरगाव चौपाटीवर मोठा बंदोबस्त लावला आहे.
गिरगाव चौपाटी येथे मुंबईतील अनेक मोठ्या मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. त्यामुळे येथे मोठा जनसागर उसळतो. या सर्व बाबी लक्षात घेत पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. स्थानिक पोलीस ठाण्याचा बंदोबस्त, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस, मुंबई वाहतूक विभाग यांचा फौजफाटाही सज्ज झाला आहे.
Live Updates -
- 10.20 PM - मुंबईत रात्री उशिरापर्यंत चालणार विसर्जन मिरवणुका
- 9.40 PM - मुंबईत गणरायाचे विसर्जन सुरळीत सुरू
- 9.30 PM - मुंबईमध्ये रात्री 9 पर्यंत 22 हजार 168 गणेश मूर्तींचे विसर्जन
- 9.20 PM - लालबागचा राजा नागपाडा जंग्शन येथे पोहचला
- 8.15 PM - लालबागच्या राजाचे भायखळा स्टेशनजवळ आगमन
- 7.50 PM - मुख्यमंत्री, रामदास आठवले, महादेव जानकर गिरगाव चौपाटीवर दाखल
- 7.45 PM - लालबागचा राजा भायखळ्यात दाखल, चिस्ती मशिदकडून आझान देऊन सलामी दिली जाणार
- 7.35 PM - लालबागचा राजा भायखळ्यात दाखल; गणेशभक्तांचा उत्साह शिगेला
- 6.40 PM - गणेश गल्लीचा राजा गिरगाव चौपाटीवर; थोड्याच वेळात होणार विसर्जन
- 6.30 PM - 'लालबागचा राजा' चिंचपोकळी पुलावर दाखल: गणेशभक्तांचा उत्साह शिगेला
- 4:15 PM - प्रसिद्ध तेजुकाया गणपती गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी आले
- 4:02 PM - लालबागचा राजा श्रॉफ बिल्डिंगजवळ येताच जोरदार पावसाला सुरुवात
- 3.45 PM - जुहू चौपाटीवर 270 घरगुती गणपतींचे तर 11 सार्वजनिक गणेशमुर्तींचे आतापर्यंत विसर्जन करण्यात आल
- 3:38 PM - लालबागचा राजा फिरून पुन्हा आपल्या मार्गावर आला, आता इथून तो चिंचपोकळी, भायखळा मार्गे गिरगाव चौपाटीला जाणार आहे. त्या पूर्वी श्रॉफ बिल्डिंग येथे पुष्पवृष्टी केली जाणार असून त्यानंतर राजा पुढील मार्गावर निघेल
- 3:38 PM - आतापर्यंत गिरगाव चौपाटीकडे निघालेले गणपती
रंगारी बदक चाळ येथील लाडका लंबोधर
करी रोडचा कैवारी
बालगोपाल गणेश मंडळ करी रोड
काळा चौकी महा गणपती
बाळ गणेश मंडळ, काळा चौकी
सीता सदन गल्ली बल्लाळेश्वर
- 3:26 PM - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी येण्यास सुरुवात, प्रथम कॉटन ग्रीनचा राजाचे विसर्जनासाठी आगमन
- 03.03 PM - परळच्या राजाची मूर्ती उंच असल्याने मिरवणूक थांबवण्यात आली, पूलाला थटत होता काही भाग
- 01.30 PM - थायलंडच्या भक्तांनी दिला बाप्पाला निरोप
- 01.30 PM - दादर कृत्रिम तलावाला भक्तांचा दुप्पट प्रतिसाद
- 01.30 PM - गणेश गल्लीची मिरवणूक निघाली
- 01.05 PM - समुद्रात 18 गणेश मूर्तींचे विसर्जन, तर कृत्रिम तलावात 36 हुन अधिक मूर्तींचे विसर्जन
- 12.09 PM - गिरगाव चौपाटीवर घरगुती गणपती विसर्जनला सुरुवात
- 11.58 AM - दादर चौपाटीवर घरगुती गणपती विसर्जनला सुरुवात
- 11.39 AM - जुहू चौपाटीवर घरगुती गणरायाचं आगमन