ETV Bharat / state

मुंबईत बनावट सोने तारण ठेवून 20 बँकांना 2 कोटींचा चुना; आरोपींना अटक

पोलिसांनी या संदर्भात तपास करत रमेश रामावतार सोनी, दिनेश रामावतार सोनी, बिमल रामावतार सोनी, अनिल कुमार गुलाबचंद स्वामी, प्रशांत सुदर्शन नारायण व एक महिला आरोपी असलेल्या नीतू सतीश विलयील या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुंबई
author img

By

Published : Jul 23, 2019, 5:44 PM IST

मुंबई - बनावट सोन्याच्या दागिन्यांचा वापर करून ते तब्बल वीस बँकांमध्ये गहाण ठेवून दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेला बँकांना चुना लावणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे.

मुंबईत बनावट सोने तारण ठेवून 20 बँकांना 2 कोटींचा चुना; आरोपींना अटक

या प्रकरणातील पीडित प्रणित जाधव हे सिद्धनाथ ज्वेलर्स नावाचे दुकान चालवत आहेत. त्यांनी कोटक महिंद्रा बँकेमध्ये लिलावासाठी ठेवलेल्या सोन्यामधील 40 ग्राम वजनाचे सोने तब्बल एक लाख 64 हजारांना त्यांनी विकत घेतले होते. हे सोने वितळवल्यावर ते 40 ग्रॅम सोन्यापैकी केवळ पाच ग्राम सोने असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली असता तपासाअंती विविध बँकांच्या लिलावातून सोने विकत घेणाऱ्या इतर व्यापाऱ्यांना देखील तब्बल 29 लाख 34 हजार रुपयांना चुना या टोळीकडून लावण्यात आल्याचे समोर आले.

यानंतर पोलिसांनी या संदर्भात तपास करत रमेश रामावतार सोनी, दिनेश रामावतार सोनी, बिमल रामावतार सोनी, अनिल कुमार गुलाबचंद स्वामी, प्रशांत सुदर्शन नारायण व एक महिला आरोपी असलेल्या नीतू सतीश विलयील या आरोपींना अटक करण्यात आली आहे. पिवळ्या धातूच्या सहा बांगड्या, सोन्याचे कुंदन, चांदीची पावडर, तांब्याचे पत्र्याचे तुकडे व विविध खडे यांसह बनावट दागिने बनवण्याचे साहित्यसुद्धा या आरोपींकडून पोलिसांनी जप्त केले आहे. अटक आरोपीनी सोन्याचा मुलामा देऊन एकाच पद्धतीचे विविध दागिने बनवले होते. सोन्याच्या शुद्धतेबाबत कोणालाही शंका येऊ नये म्हणून त्यावर त्रिकोणी मानचिन्हसुद्धा या टोळीने बनवले होते.

या बनावट सोन्याच्या दागिन्यांचा वापर करत वेगवेगळ्या बँकांमध्ये त्यांनी सोने गहाण ठेवून त्यावर मोठी रक्कमसुद्धा कर्ज स्वरूपात काढली होती. अंदाजे दोन कोटी पेक्षा जास्त रकमेची बँकांची लूट या आरोपींनी केलेली आहे. न्यायालयात आरोपींना हजर केले असता न्यायालयाने या सर्व आरोपींची रवानगी एक जुलैपर्यंत पोलीस कोठडीत केलेली आहे.

Intro:बनावट सोन्याच्या दागिन्यांचा वापर करून ते तब्बल वीस बँकांमध्ये गहाण ठेवून दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेला बँकांना चुना लावणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे .
Body:या प्रकरणातील पीडित प्रणित जाधव हे सिद्धनाथ ज्वेलर्स नावाचे दुकान चालवत असून त्यांनी कोटक महिंद्रा बँकेमध्ये लिलावासाठी ठेवलेल्या सोन्यामधील 40 ग्राम वजनाचे सोने तब्बल एक लाख 64 हजारांना त्यांनी विकत घेतले होते .हे सोनं वितळवविल्यावर त् 40 ग्रॅम सोण्या पैकी केवळ पाच ग्राम सोने असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले .या प्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केली असता तपासाअंती विविध बँकांच्या लिलावातून सोने विकत घेणाऱ्या इतर व्यापाऱ्यांना देखील तब्बल 29 लाख 34 हजार रुपयांना चुना या टोळीकडून लावण्यात आल्याचे समोर आलं . Conclusion:यानंतर पोलिसांनी या संदर्भात तपास करीत 1) रमेश रामावतार सोनी 2) दिनेश रामावतार सोनी 3) बिमल रामावतार सोनी 4) अनिल कुमार गुलाबचंद स्वामी 5)प्रशांत सुदर्शन नारायण व एक महिला आरोपी या 6) नीतू सतीश विलयील या आरोपींना अटक करण्यात आली आहे . पिवळ्या धातूच्या सहा बांगड्या , सोन्याचे कुंदन , चांदीची पावडर, तांब्याचे पत्र्याचे तुकडे व विविध खडे यांसह बनावट दागिने बनविण्याचे साहित्य सुद्धा या आरोपींकडून पोलिसांनी जप्त केले आहे. अटक आरोपीनी सोन्याचा मुलामा देऊन एकाच पद्धतीचे विविध दागिने बनवले होते सोन्याच्या शुद्धतेबाबत कोणालाही शंका येऊ नये म्हणून त्यावर त्रिकोणी मानचिन्ह सुद्धा यांनी बनवल.

या बनावट सोन्याच्या दागिन्यांचा वापर करत वेगवेगळ्या बँकांमध्ये त्यांनी सोनं गहाण ठेवून त्यावर मोठी रक्कमसुद्धा कर्ज स्वरूपात काढली होती. अंदाजे दोन कोटी पेक्षा जास्त रकमेची बँकांची लूट या आरोपींनी केलेली आहे. न्यायालयाने आरोपींना हजर केले असता न्यायालयाने या सर्व आरोपींची रवानगी एक जुलैपर्यंत पोलिस कोठडीत केलेली आहे.

( बाईट - सुनील बाजारे , पोलीस निरीक्षक , )
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.