ETV Bharat / state

कोरोनाचे विघ्न दूर कर, राजकीय नेत्यांचे बाप्पांना साकडे - माजी कृषी मंत्री अनिल बोंडे बातमी

राज्यात आज सर्वत्र गणेशाचे आगमन झाले. मोठ्या उत्साहास साजरा होणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट पसरल्याने सर्वत्र साध्या पद्धतीने बाप्पांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. राज्यातील विविध राजकीय नेत्यांनीही आपापल्या घरी बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे साकडे घातले आहे.

edited photo
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Aug 22, 2020, 9:34 PM IST

राज्यात आज सर्वत्र गणेशाचे आगमण झाले. मोठ्या उत्साहास साजरा होणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट पसरल्याने सर्वत्र साध्या पद्धतीने बाप्पांच्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. राज्यातील विविध राजकीय नेत्यांनीही आपापल्या घरी बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे साकडे घातले आहे.

नांदेड - राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या नांदेड येथील निवासस्थानी सर्व कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत गणेशाची स्थापना केली. देशाला व संपूर्ण जगाला कोरोनातून मुक्त करावे, असे साकडे घातले. यावेळी त्यांनी कुटुंबियांसमवेत बाप्पांच्या मूर्तीची पूजा केली.

ashok chavan
बाप्पांची सहपत्नीक पूजा करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

बीड - राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी (22 ऑगस्ट) परळी येथे साध्या पद्धतीने गणरायाचे स्थापना केली. सबंध राज्यावर आलेल्या कोरोनाचे संकट गणपती बाप्पा लवकर दूर कर, अशी प्रार्थना मंत्री मुंडे यांनी गणरायाकडे केली आहे.

munde
बाप्पांची पूजा करताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

रायगड - घरामध्ये आज लाडक्या गणरायांचे आगमन झाले आहे. कोरोनाचे संकट असल्याने उत्सवावर यंदा अनेक मर्यादा व निर्बंध असले तरी घरगुती उत्साहात मात्र कमतरता जाणवत नाही. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानीही गणरायाची मंगलमय वातावरण स्थापना करून पूजाअर्चा तसेच आरती करण्यात आली. यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. या सर्वांनी जगावरती आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर करण्यासाठी बाप्पा ला साकडे घातले.

sunil tatkare
सपत्नीक श्रींची पूजा करताना खासदार सुनील तटकरे

यवतमाळ - जिल्ह्यात आज सर्वत्र बाप्पांचे आगमन झाले. राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या घरी बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनाचे विघ्न दूर करण्यासाठी वनमंत्री राठोड यांनी प्रार्थना केली. वनमंत्री राठोड यांच्या घरी बाप्पांचे आगमन होताच कुटुंबिय व मित्रांनी बाप्पांचा जयघोष केला.

sanjay rathod
बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना वनमंत्री संजय राठोड व कुटुंबिय

जळगाव - भाजपचे माजीमंत्री आमदार गिरीश महाजन यांनी शनिवारी (22 ऑगस्ट) सकाळी आपल्या जामनेर येथील राहत्या घरी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना केली. त्यांनी, गणराया, जगावर आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाचे निवारण होऊ दे, सर्व काही पूर्ववत होऊ दे, सर्वांना आरोग्यमय आणि सुख-समृद्धी लाभू दे, असे साकडे गणरायाला घातले. यावेळी त्यांनी सपत्नीक बापांच्या मुर्तींची पूजा केली.

girish mahajan
कुटुंबियांसमवेत श्रींची आरती करताना आमदार गिरीश महाजन

नागपूर - भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जवळ असलेल्या कोराडी येथील घरी गजाननाचे आगमन झाले आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाप्पांच्या मूर्तीची पूजा केल्यानंतर आरती केली. यावेळी त्यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे, मुलगा संकेत, मुलगी पायल व जावई लोकेश आष्टनकर उपस्थित होते.

chandrashekhar bavankule
बाप्पांसह माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबिय

शिर्डी (अहमदनगर) - राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशाची स्थापना साध्या पध्दतीने करण्यात आली. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, विश्वासराव कडू कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे यांच्यासह सर्व संचालक अधिकारी कामगार उपस्थित होते. कोराना संकटाने अडचणीत आलेल्या समाजाच घटकांना पुन्हा नव्याने नवी उमेद देवून सुख समृध्दी नांदावी म्हणून गणेशाला आपण साकडे घातले. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेल्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून प्रवरा परिसरातील 27 गावांनी गणेश उत्सव साजरा न करण्याचे ठराव पोलीस प्रशासनाकडे दिले आहेत.

vikhe patil
बाप्पांची पूजा करताना विखे पाटील दाम्पत्य

अमरावती - भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या अमरावती येथील निवासस्थानीही बाप्पाचे विराजमान झाले. यावेळी अनिल बोंडे यांनी सह-परिवार गणपतीची आरती केली. यावेळी गणराया या सरकारला शेतकऱ्यांच्या दुधाला भाव देण्याची सुबुद्धी दे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त कर, असे साकडे त्यांनी गणेशाला घातले.

anil bonde
बाप्पांची पूजा करताना माजी मंत्री अनिल बोंडे

हेही वाचा - 'वर्षा'वर कुटुंबीयांसमवेत मुख्यमंत्र्यांनी केली श्री गणेशाची प्रतिष्ठापना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.