ETV Bharat / state

Ganeshotsav 2023: गणेश विसर्जनाची गिरगाव चौपाटीवर जोरदार तयारी, पालिका कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा तैनात

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव धूम धडाक्यात पार पडतोय. आता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ झालीय. या अनुषंगानं आता गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाची जोरदार तयारी सुरू झालीय. यावेळी पालिका कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. (Ganesh Visarjan)

Ganeshotsav 2023
गणेशोत्सव २०२३
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 8:12 PM IST

गणेश विसर्जनाची तयारी

मुंबई Ganeshotsav 2023 : मुंबईत वाजत गाजत गणरायाचं आगमन झालंय. गणराया विराजमान होऊन आठ दिवस होत आहेत. त्यातच दीड दिवस, पाच दिवस आणि सात दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन समुद्रात केलं जातंय. याच पार्श्वभूमीवर बाप्पाच्या विसर्जनासाठी आपण समुद्रकिनारी जात असाल, तर आपण स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून खबरदारी घेण्याबाबत आवाहन करण्यात आलंय. उद्या दहा दिवसांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे. तर दुसरीकडे समुद्रातील 'स्टिंग रे' आणि 'जेलीफिश' यांची भीती अनेकांना वाटत आहे. त्यामुळं भाविकांनी सावधानता बाळगावी. महापालिकेकडून खबरदारी म्हणून उपाय योजनेबाबत पाऊलं उचललेली आहे.

'अशी' घ्या काळजी : बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करताना आपण समुद्रकिनाऱ्यावर जातो. अनेकदा आपल्याला स्टिंग रे चावतो, पण आपल्याला ते ओळखता येत नाही. 'स्टिंग रे'नं दंश केला तर आपल्याला चटका लागल्यासारखं जाणवतं. त्यासोबत मोठ्या प्रमाणात खाज सुटतं. स्टिंग रे आणि जेलीफिष दंश केल्यानं घाबरून जाऊ नये, तात्काळ प्रथम उपचार घ्यावे. जखम स्वच्छ पाण्यानं धुवून टाकावी. त्यावर आपण बर्फ देखील लावू शकतो. चौपाटी परिसरामध्ये यावर उपाययोजना म्हणून 108 क्रमांकाची रुग्णवाहिका तैनात करण्यात आलीय. वैद्यकीय मदत कक्ष देखील सज्ज ठेवण्यात आलाय, अशी माहिती डॉक्टर अल्फीया रिझबी यांनी दिलीय.

विविध सुविधांची व्यवस्था : गणपती विसर्जन सोहळ्यात कोणतीही गैरसोय होऊ नये. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पालिका देखील सज्ज झालीय, असं प्रशासनानं सांगितलं आहे. यावर्षी पालिकेचे 10 हजार कर्मचारी, जीवरक्षक 71 नियंत्रण कक्ष तसेच प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, प्रसाधन केंद्र आणि विविध सुविधांची व्यवस्था केल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आलीय. तर, या विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं यावर्षी 69 नैसर्गिक जलाशयांची निवड केलीय. 191 कृत्रिम तलाव तयार केले आहेत.

मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त : मुंबईतील गणपती विसर्जनाची भव्यता पाहता प्रशासन देखील सज्ज झालंय. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जे कर्मचारी सुट्टीवर होते, त्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. बीएमसी, पोलीस, वाहतूक विभागासह विविध सरकारी यंत्रणा वाजतगाजत गुलाल उधळत निरोप घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 28 सप्टेंबरला विसर्जनाच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरातील प्रमुख रस्ते बंद राहणार आहेत. याशिवाय विसर्जनाच्या निमित्तानं मुंबईतील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आलीय.

रस्त्यांवर वाहने उभी करण्यास बंदी : अनंत चतुर्दशीनिमित्त पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. चौपाटी आणि तलाव येथे विसर्जनासाठी पालिकेनं योग्य ती तयारी केलीय. मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गांसह परिसरातील काही रस्ते सकाळी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतलाय. अनेक रस्त्यांवर वाहनं उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंद केलेल्या मार्गांना पर्यायी मार्गही परिवहन विभागानं उपलब्ध करून दिलाय. याशिवाय मुंबईत येणाऱ्या अवजड वाहनांनाही या दिवशी बंदी घालण्यात आलीय. मात्र, दूध आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. Ganesh Festival 2023 : गणेशभक्त कृष्णाने मागील 14 वर्षांपासून जपून ठेवल्या बाप्पाच्या मूर्ती; विनायक भक्तीचा असाही लळा
  2. Ganesh Festival 2023 : कुलस्वामिनी प्रतिष्ठानने साकारला शिवराज्याभिषेक सोहळा, शेतीत राबणारा गणपती ठरतोय आकर्षण
  3. Mahaprasad To Tekdi Ganesh : टेकडीच्या गणपतीला अकराशे एक किलो लाडूचा महाप्रसाद, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.