ETV Bharat / state

Ganeshotsav २०२३ : बाप्पाचं विसर्जन झालं, आता समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी पालिका राबवणार मोहिम - जुहू समुद्रकिनारा

Ganeshotsav 2023 : मुंबईत गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर आता पालिकेकडून समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहिम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेत महानगरपालिकेचे कर्मचारी, कामगार, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश राहणार असल्याची माहिती पालिकेनं दिलीय.

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 11:41 AM IST

मुंबई Ganeshotsav 2023 : मुंबईत पाच दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाला शनिवारी सायंकाळी सुरुवात झाली. हा विसर्जन सोहळा रविवारी पहाटेपर्यंत सुरूच होता. यंदाच्या गणेशोत्सवात पाच दिवसांच्या एकूण 29 हजार 792 घरगुती मूर्ती तर 597 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल 18 हजार 206 घरगुती गणपतीची संख्या वाढल्याची माहिती पालिकेनं दिलीय. या गणपतींचं विसर्जन मुंबईतील विविध समुद्रकिनारे आणि कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आलंय. या विसर्जनानंतर आता समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेच आव्हान पालिकेसमोर आहे.

मुंबईतील समुद्रकिनारे करणार स्वच्छ : भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छतेची मोहीम हाती घेतलीय. पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, या स्वच्छता मोहिमेत महानगरपालिकेचे कर्मचारी, कामगार, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. या मोहिमेत श्रमदान करत निर्माल्यासह प्लास्टिक तसंच भरतीमुळे किनाऱ्यावर वाहून आलेला कचरा गोळा करून मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ केले जाणार आहेत. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणे, त्याचप्रमाणे स्वच्छ मुंबई संकल्पना अधिक व्यापकतेने राबवण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी पालिकेने गणेशोत्सव काळात विशेष मोहीमही राबवण्यात आली होती.

आतापर्यंत 25 मेट्रीक टन कचरा जमा : पालिकेनं रविवारपासून समुद्रकिनारा स्वच्छतेच्या मोहिमेला सुरुवात केलीय. पुढील काही दिवस ही मोहीम सुरूच राहील. त्यानंतर अनंत चतुर्थीला गणपती विसर्जन झाल्यानंतरही ही मोहीम राबवण्यात येईल अशी माहिती पालिकेनं दिलीय. आतापर्यंत या मोहिमेत माहीम माहीम समुद्रकिनारा, वर्सोवा समुद्रकिनारा, जुहू समुद्रकिनारा, मार्वे समुद्रकिनारा, बुधवार पार्क याठिकाणी पालिकेनं स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं स्वच्छता मोहीम राबवलीय. इतर समुद्रकिनारेही स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. या पाच समुद्रकिनाऱ्यांवरून आतापर्यंत अंदाचे 25 मेट्रिक टन निर्माल्य व कचरा गोळा केल्याची माहिती पालिकेनं दिलीय.

हेही वाचा :

  1. Mumbai Ganesh Dekhava : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव कुठल्या दिशेला जातोय? पाहा अप्रतिम गणेश देखावा
  2. Ganesh Festival 2023: पाच हजार वर्षांपूर्वी खाम नदीच्या तीरावर प्रकटले श्रीगणेश ; जाणून घेऊ शिंदूरात्मक गणपतीची आख्यायिका
  3. Sahyadri Krida Mandal Ganapati: श्रीकृष्णाच्या गोकुळ नगरीत अवतरला सह्याद्रीचा गणपती बाप्पा, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.