ETV Bharat / state

पवईतील गणेश मंडळाने भरले, होतकरु विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शालेय शुल्क

कला विकास मंडळ दरवर्षी वेगवेगळे सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवित वारसा जपण्याचे काम करीत असते. परिसरात नव्याने बांधण्यात येत असलेल्या समाजमंदिरात मोफत वृत्तपत्र वाचनालय, संगणक वर्ग, दहावी-बारावीच्या विद्यार्थांना मार्गदर्शन शिबीर, असे सामाजिक उपक्रम वर्षभर राबवणार असल्याचे मंडळाचे सदस्य दिनेश गाडे यांनी सांगितले आहे.

author img

By

Published : Sep 12, 2019, 4:16 AM IST

मुंबई- पवईतील कला विकास मंडळाने यावर्षी पवई परिसरातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शालेय शुल्क भरुन सामाजिक वारसा जपण्याचे काम केले आहे. यावेळी मंडळाचे 45 वे वर्ष आहे. मंडळ गेले दोन वर्षांपासून हा उपक्रम गणेशोत्सव काळात खर्चात बचत करत राबवत आहे.

मंडळाचे सदस्य दिनेश गाडे

हेही वाचा-सीएसटीएम परिसरात ओणम निमित्त काढण्यात आली मनमोहक रांगोळी

कला विकास मंडळ दरवर्षी वेगवेगळे सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवित वारसा जपण्याचे काम करीत असते. परिसरात नव्याने बांधण्यात येत असलेल्या समाजमंदिरात मोफत वृत्तपत्र वाचनालय, संगणक वर्ग, दहावी-बारावीच्या विद्यार्थांना मार्गदर्शन शिबीर, असे सामाजिक उपक्रम वर्षभर राबवणार असल्याचे मंडळाचे सदस्य दिनेश गाडे यांनी सांगितले आहे.

तसेच होतकरू व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, म्हणून त्यांचे शालेय शुल्क, शालेय साहित्य देऊन मदत मंडळ करत आहे. गेल्या वर्षी मंडळाने पवईतील ज्ञानमंदिर विद्यालय, पवई इंग्लिश हायस्कूल, पवई मराठी शाळा या तीन शाळातील 250 गरजू विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शालेय शुल्क भरले होते. या वर्षी हा आकडा मंडळाने वाढवण्याचा मानस केला. आणि जमेल तेवढे देणगी व वर्गणी जमा करुन समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने या मंडळाने यावर्षी ज्ञान मंदिर शाळा, पवई इंग्लिश हायस्कूल, पवई मराठी शाळा यातील गरजू व होतकरू 350 विद्यार्थ्यांची 6 लाख 50 हजार रुपये शालेय शुल्क शाळेमध्ये चेकद्वारे जमा केले.

यंदाच्या वर्षी कला विकास गणेश मंडळाने बाप्पाच्या सजावटीच्या माध्यमातून दूर अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या व तेथूनच ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे अजरामर समरगीत लिहिणार्‍या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनपट असणारा देखावा साकारला आहे.

Intro:पवईतील गणेश मंडळाने खर्चात बचत करून होतकरु विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शालेय शुल्क भरले
(Byt... दिनेश गाडे पवई)

पवईतील कला विकास मंडळाने यावर्षी पवई परिसरातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शालेय शुल्क 6 लाख 50 हजार रुपये विविध शाळेत भरून सामाजिक वारसा जपण्याचे काम केले आहे . मंडळाचे 45 वे वर्ष आहे मंडळ गेले दोन वर्षांपासून हा उपक्रम गणेशोत्सव काळात खर्चात बचत करत शुल्क भरत आहेBody:पवईतील गणेश मंडळाने खर्चात बचत करून होतकरु विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शालेय शुल्क भरले

पवईतील कला विकास मंडळाने यावर्षी पवई परिसरातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांचे वर्षभराचे शालेय शुल्क 6 लाख 50 हजार रुपये विविध शाळेत भरून सामाजिक वारसा जपण्याचे काम केले आहे . मंडळाचे 45 वे वर्ष आहे मंडळ गेले दोन वर्षांपासून हा उपक्रम गणेशोत्सव काळात खर्चात बचत करत शुल्क भरत आहे.

कला विकास मंडळ दरवर्षी वेगवेगळे सामाजिक धार्मिक उपक्रम राबवित वारसा जपण्याचे काम करीत असते परिसरात नव्याने बांधण्यात येत असलेल्या समाजमंदिरात मोफत वृत्तपत्र वाचनालय, संगणक वर्ग, दहावी-बारावीच्या विध्यार्थी मार्गदर्शन शिबीर असे सामाजिक उपक्रम वर्षभर राबवणार असल्याचे मंडळाचे सदस्य दिनेश गाडे म्हणाले.

तसेच होतकरू व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून त्यांची शालेय शुल्क, शालेय साहित्य देऊन मदत मंडळ करत आहे.गेल्या वर्षी मंडळाने पवईतील ज्ञानमंदिर विद्यालय , पवई इंग्लिश हायस्कूल , पवई मराठी शाळा या तीन शाळातील 250 गरजू विद्यार्थ्यांची वर्षभराचे शालेय शुल्क भरले होते या वर्षी हा आकडा मंडळाने वाढवण्याचा मानस केला आणि जमेल तेवढे देणगी व वर्गणी जमा करून समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने या मंडळाने यावर्षी ज्ञान मंदिर शाळा ,पवई इंग्लिश हायस्कूल, पवई मराठी शाळा यातील गरजू व होतकरू 350 विद्यार्थ्यांची 6 लाख 50 हजार रुपये शालेय शुल्क शाळेमध्ये चेक द्वारे जमा केले आहे.

यंदाच्या वर्षी कला विकास गणेश मंडळाने बप्पाच्या सजावटीच्या माध्यमातून दूर अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या व तेथूनच ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला हे अजरामर समरगीत लिहिणार्‍या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनपट असणारा देखावा साकारला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.