मुंबई : Ganesh Idol Immersion : देशभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात (Ganesh Visarjan २०२३) आला आहे. गणेश विस्रजन मिरवणुकीनंतर मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग जमा झाल्याचं पहायला मिळालं. मात्र समुद्र किनाऱ्यावर झालेला कचरा साफ ( Clean Up Campaign ) करण्यासाठी दिग्गज अभिनेत्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभागी होत स्वच्छता अभियान राबवलं. यात अभिनेता राजकुमार राव, माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर, अमृता फडणवीस, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदींचा समावेश आहे.
-
#WATCH | On organising a cleanliness drive at Juhu Beach, social worker & singer Amruta Fadnavis says, "Many people including celebrities and the city police commissioner have joined this beach cleanup. It is our responsibility to leave a clean planet for future generations.… pic.twitter.com/kCAf9jg0ZV
— ANI (@ANI) September 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | On organising a cleanliness drive at Juhu Beach, social worker & singer Amruta Fadnavis says, "Many people including celebrities and the city police commissioner have joined this beach cleanup. It is our responsibility to leave a clean planet for future generations.… pic.twitter.com/kCAf9jg0ZV
— ANI (@ANI) September 29, 2023#WATCH | On organising a cleanliness drive at Juhu Beach, social worker & singer Amruta Fadnavis says, "Many people including celebrities and the city police commissioner have joined this beach cleanup. It is our responsibility to leave a clean planet for future generations.… pic.twitter.com/kCAf9jg0ZV
— ANI (@ANI) September 29, 2023
गणेश विसर्जनानंतर किनाऱ्यांवर कचऱ्याचे ढिग : राज्यात भाविकांनी मोठ्या भक्तीभावात सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला आहे. मात्र बाप्पाला निरोप दिल्यानंतर मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे. या कचऱ्यामुळे समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवलं आहे.
-
#WATCH | Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Commissioner Iqbal Singh Chahal, Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar and Bollywood actors Raj Kummar Rao and Manushi Chhillar take part in Juhu beach clean-up drive in Mumbai pic.twitter.com/7UqaicfX69
— ANI (@ANI) September 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Commissioner Iqbal Singh Chahal, Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar and Bollywood actors Raj Kummar Rao and Manushi Chhillar take part in Juhu beach clean-up drive in Mumbai pic.twitter.com/7UqaicfX69
— ANI (@ANI) September 29, 2023#WATCH | Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Commissioner Iqbal Singh Chahal, Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar and Bollywood actors Raj Kummar Rao and Manushi Chhillar take part in Juhu beach clean-up drive in Mumbai pic.twitter.com/7UqaicfX69
— ANI (@ANI) September 29, 2023
-
Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Commissioner Iqbal Singh Chahal says, " On 1st Oct, we are conducting cleanliness drives at 168 locations in Mumbai...We are setting up seven Sewage Treatment Plants at the cost of Rs 25,000 crore in Mumbai. this way we will be able to… pic.twitter.com/UsI4eLtgDD
— ANI (@ANI) September 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Commissioner Iqbal Singh Chahal says, " On 1st Oct, we are conducting cleanliness drives at 168 locations in Mumbai...We are setting up seven Sewage Treatment Plants at the cost of Rs 25,000 crore in Mumbai. this way we will be able to… pic.twitter.com/UsI4eLtgDD
— ANI (@ANI) September 29, 2023Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Commissioner Iqbal Singh Chahal says, " On 1st Oct, we are conducting cleanliness drives at 168 locations in Mumbai...We are setting up seven Sewage Treatment Plants at the cost of Rs 25,000 crore in Mumbai. this way we will be able to… pic.twitter.com/UsI4eLtgDD
— ANI (@ANI) September 29, 2023
स्वच्छता हीच खरी सेवा : या स्वच्छता अभियानात अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री तथा माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर, अमृता फडणवीस, महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, खासदार श्रीकांत शिंदे, आदी दिग्गज सहभागी झाले होते. या दिग्गजांनी स्वच्छता अभियानात सहभागी होत जुहू समुद्र किनाऱ्यावरील कचरा साफ केला. यावेळी त्यांच्यासह सामाजिक संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी जुहू समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवला. यावेळी चित्रपट अभिनेता राजकुमार राव यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता हीच खरी सेवा असल्याचा संदेश दिला आहे. त्यानुसार आम्ही ही खरी सेवा करत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आपण आपल्या शहराला, देशाला स्वच्छ ठेवू शकतो, असंही राजकुमार राव यानं स्पष्ट केलं.
प्रत्येकानं योगदान दिलं, तरच स्वच्छता टिकेल : जुहू समुद्र किनाऱ्यावर राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. याबाबत त्यांना विचारलं असता, त्यांनी प्रत्येक व्यक्तीनं योगदान दिलं, तरच आपण पृथ्वीला सुंदर ठेवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेसाठी काळजी घेणं गरजेचं आहे. नागरिक जागृत असल्यामुळेच मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करण्यासाठी सगळ्यांनी सहभाग नोंदवला आहे. मुंबईतील समुद्र किनारे हे जगातील सर्वात सुंदर समुद्र किनारे आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणं गरजेचं असल्याचंही अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
CM Eknath Shinde : मोदींनी बरीच साफसफाई केली, राज्यातही बरीच साफसफाई बाकी - मुख्यमंत्री
महाबलीपूरमच्या किनाऱ्यावर मोदींचे स्वच्छता अभियान, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा दिला संदेश