मुंबई - आज देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतदेखील गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्यात पोहचली आहे. यावर्षी गणेशोत्सवार कोरोनाचे सावट असूनही गणेशभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. शहरातील गणेश मंडळ गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची पूजा चालू होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळांनी विशेष काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती मुंबईचा राजा गणेश गल्ली यांची यावर्षी मूर्तीची उंची कमी केली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम अटी पाळून सुरक्षित गणेशोत्सव याठिकाणी साजरा करण्यात येत आहे.
कोरोनाच्या सावटात मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ओळखली जाणाऱ्या मुंबईत देखील गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्यात पोहचली आहे. यावर्षी गणेशोत्सवार कोरोनाचे सावट असूनही गणेशभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही आहे. शहरातील गणेश मंडळ गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची पूजा चालू होणार असून कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व गणेश मंडळांनी विशेष काळजी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचे ध्येय समोर ठेवलं आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती मुंबईचा राजा गणेश गल्ली यांची यावर्षी मूर्तीची उंची कमी केली असुन कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व नियम अटी पाळून सुरक्षित गणेशोत्सव याठिकाणी साजरा करण्यात येत आहे.