ETV Bharat / state

Sanjay Raut : कीर्तिकरांचे पुत्र राऊतांच्या भेटीला; राऊत म्हणाले, 'फुटीरांच्या प्रत्येक गटात एक एकनाथ शिंदे असतो' - संजय राऊत

गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर (Gajanan Kirtikar son Amol Kirtikar) यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत (Amol Kirtikar met to Sanjay Raut) दिले. तर, फुटीरांच्या प्रत्येक गटात एक एकनाथ शिंदे असतो, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.

Amol Kirtikar met to Sanjay Raut residence
अमोल कीर्तीकर यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट घेतली
author img

By

Published : Nov 13, 2022, 5:35 PM IST

मुंबई : उद्धव ठाकरेंचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. शुक्रवारी त्यांचा प्रवेश सोहळा झाला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. गजानन कीर्तिकारांच्या जाण्याने पक्षाला कोणताही फार मोठा परिणाम होणार नाही. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी शनिवारी दिली. त्यानंतर लगेचच आज गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांनी (Gajanan Kirtikar son Amol Kirtikar) संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले. तर, फुटीरांच्या प्रत्येक गटात एक एकनाथ शिंदे असतो, असा खोचक टोला देखील त्यांनी (Amol Kirtikar met to Sanjay Raut)लगावला.

अमोल कीर्तिकर आमच्यासोबत : यावेळी बोलताना ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, अमोल किर्तीकर हे आदित्य ठाकरेंसोबत काम करणारे आमचे एक तरुण नेते आहेत. गजानन कीर्तिकर यांनी वेगळा निर्णय घेतला. परंतु, अमोल आज मला भेटायला आले ह्याचा मला आनंद झाला आहे. गजानन कीर्तिकर यांनी घेतेला निर्णय दुर्दैवी आहे. पण, अमोल किर्तीकर आमच्यासोबत असल्याचा आनंद आहे.

अमोल कीर्तीकर यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट घेतली

फुटीरांच्या गटात एकनाथ शिंदे : यावेळी पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे इतके दिवस जे काही सांगत आहेत, ती बाब खरी आहे. महाराष्ट्रात लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील. त्याबाबतची तयारी दिल्लीमध्ये सुरू आहे. आता या बंडखोरी केलेल्यांमध्ये जी काही लोक आहेत, त्यांच्यामध्येच नाराजी आहे. त्यांच्यातच गट पडले. त्यामुळे तिकडे सुद्धा अस्थिरता आहे. यावर उपाय म्हणजे या निवडणुकांची तयारी दिल्लीमध्ये सुरू आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक बंडखोर गटात एक एकनाथ शिंदे असतो. असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी (Amol Kirtikar met to Sanjay Raut residence) लगावला.

महाराष्ट्र म्हणून एकत्र या : वेदांत फॉक्सकॉन असेल बल्क ट्रक पार्क असेल, किंवा टाटा एअरबस सारखे अनेक मोठे प्रकल्प ज्यातून कितीतरी लाखो तरुणांना रोजगार मिळाला असता असे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले. त्यानंतर आता ऊर्जा प्रकल्प देखील महाराष्ट्रातून गेला आहे. यावरून संजय राऊत यांनी विरोधक आणि सत्ताधारी या दोघांनाही एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. राऊत म्हणाले की, प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर का जात आहेत ? या करता सत्ताधारी विरोधक यांनी एकत्रितपणे बैठक घेतली पाहिजे. त्यांनी लक्षात घ्यायला हवं यातून महाराष्ट्राचे नुकसान होतेय. सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील दोघांनीही महाराष्ट्र म्हणून एकत्र यायला हवे. या सर्व प्रकल्पांच्या बाबत चर्चा करायला हवी. महाराष्ट्राला देशाच्या नकाशावर नाहीस करण्याचे हे प्रयत्न केले जात आहेत. असे देखील संजय राऊत यांनी म्हटले (Sanjay Raut residence) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.