ETV Bharat / state

'ब्रेक द चैन' : आजपासून 'बेस्ट' बसेस पूर्ण आसनक्षमतेनुसार धावणार - From today, the 'best' buses will run at full seating capacity

मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे राज्य सरकारने १४ एप्रिलला लॉकडाऊन लावला. रुग्णसंख्या कमी होत असल्याने सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.

best bus
बेस्ट बस
author img

By

Published : Jun 7, 2021, 9:37 AM IST

मुंबई - कोरोनाचा प्रसार होत असल्याने राज्य सरकारने १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लावला होता. 'ब्रेक द चैन'नुसार हा लॉकडाऊन शिथिल केला जात आहे. त्यानुसार मुंबईमधील बेस्टच्या बसेस आजपासून पूर्ण आसनक्षमतेनुसार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे बसमधील प्रत्येक सीटवर बसून प्रवाशांना प्रवास करता येणार असल्याने लाखो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता -

मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे राज्य सरकारने १४ एप्रिलला लॉकडाऊन लावला. रुग्णसंख्या कमी होत असल्याने सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यासाठी ५ टप्पे करण्यात आले आहेत. मुंबई यात तिसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यातील नियमानुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा - नागपुरात 12 ते 18 वर्षाच्या 40 जणांवर कोवॅक्सिन लसीची चाचणी

पूर्ण आसनक्षमतेनुसार प्रवासी -

मुंबईमध्ये लोकल, बेस्ट बस, मेट्रो आणि मोनो ही सार्वजनिक वाहतुकीची साधने आहेत. यामधील लोकल ट्रेनमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सामान्य नागरिकांना प्रवास करण्यास मुभा नाही. यामुळे नागरिकांना बेस्टच्या बस सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. बेस्ट बसेस सध्या ५० टक्के प्रवाशांसाह चालवल्या जात आहेत.लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना आजपासून बेस्टच्या बसगाड्यांमधील पूर्ण आसनक्षमतेनुसार प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामुळे बसमधून प्रत्येक सीटवर प्रवाशांना बसून प्रवास करता येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाकडून अधिकाधिक बसगाड्या चालविल्या जाणार आहेत. तरी मुंबईकर प्रवाशांनी बसमधून प्रवास करतेवेळी तोंडावर मास्क लावून प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - उपचार घेणाऱ्या बालकाचा मृत्यू कोविडमुळे नाही; नाशिक जिल्हा शल्य चिकित्सकाचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.