ETV Bharat / state

Gutari Amavasya : गटारीनिमित्ताने भाजपतर्फे मोफत कोंबडी वाटप; पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल - भाजपकडून गटारी निमित्त मोफत कोंबडी वाटप

सोमवारी गटारी अमावास्या असल्याने भाजपकडून गटारी निमित्त मोफत कोंबडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोकण विकास आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे पोस्टर सोशल मीडियावर फिरत आहे.

Gutari Amavasya
Gutari Amavasya
author img

By

Published : Jul 15, 2023, 3:51 PM IST

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात गटारी अमावास्या ही एका उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते. गटारी अमावास्येनंतर लगेचच श्रावण महिना सुरू होत असल्याने अनेकजण या महिन्यात मांसाहार करत नाहीत. त्यामुळे गटारीच्या दिवशी अनेक जण मनसोक्तपणे मांसाहारावर ताव मारतात. यावर्षी सोमवारी गटारी अमावास्या असल्याने बहुतांश लोक हे रविवारीच हा उत्सव साजरा करणार आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत असून या मेसेजमध्ये मोफत कोंबडी वाटप करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. गटारीच्या निमित्ताने मोफत कोंबडी वाटप होत असल्याने हा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे.

काय आहे मेसेज : भारतीय जनता पार्टीच्या कोकण विकास आघाडीच्या नावाने सध्या सोशल मीडियावर 'गटारी' निमित्त मोफत कोंबडी वाटप कार्यक्रमाचा मेसेज व्हायरल होत आहे. हा कार्यक्रम आज सायंकाळी सहा वाजता मुंबईतील प्रभादेवी नाका येथे आयोजित करण्यात आला आहे. या व्हायरल मेसेजमध्ये काही आयोजकांची नावे देखील देण्यात आली आहेत. यात मुंबई सचिव सचिन शिंदे, भाजपचे पदाधिकारी बबन तोडणकर, चेतन देवळेकर यांची नावे आहेत. विशेष म्हणजे यात पंतप्रधान नरंद्र मोदी, आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांचे फोटो देखील वापरण्यात आले आहेत. मात्र, हा मेसेज आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर भाजपने यू-टर्न घेतला आहे.

आयोजक म्हणतात 'तो' मी नव्हेच : या व्हायरल मेसेजची पुष्टी करण्यासंदर्भात आम्ही आयोजक सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, गेली कित्येक वर्ष दादर माहीम विभागात कार्यरत असून पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. काही खोडसाळ प्रवृत्तींनी माझी प्रतिमा खराब करण्यासाठी कोंबडी वाटपासारख्या एका निंदनीय उपक्रमात माझ्या फोटोचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा स्वरूपाचा कोणताही कार्यक्रम घेण्यास मी सांगितले नव्हते.

माझा पाठिंबा नाही-शिंदे : याबाबत सचिन शिंदे म्हणाले की, या मोफत कोंबडी वाटपाच्या कार्यक्रमाला माझा कोणताही पाठिंबा किंवा कोणत्याही प्रकारचे सहकार्य नव्हते. मी स्वतःही या प्रकाराची चौकशी करत आहे. तसेच ज्यांनी कोणी जाणूनबुजून हा प्रकार केला आहे, त्यांना योग्य त्या कारवाईला सामोरे जावे लागेल. तरी आपणास माझी नम्र विनंती आहे की, सदर माहिती ही खोटी असून त्या पद्धतीचे मेसेज फॉरवर्ड करणे थांबवावे. मी एक सामाजिक जाणीव जोपासणारा जबाबदार व्यक्ती असून सदरहू उपक्रमात माझे नाव, फोटो गोवण्यात आल्याने माझी प्रतिमा खराब होत आहे. दादर माहीम विभागात मी आरोग्य, शिक्षण, क्रीडा, तसेच इतर क्षेत्रात युवा, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम आयोजित केले आहेत. आपण माझ्या या विनंतीचा सन्मान राखाल ही अपेक्षा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.