ETV Bharat / state

राज्यातील घरवापसी : गावी जाणाऱ्यांसाठी 'लालपरी'ची मोफत सेवा, सरकारने तयार केले पोर्टल - Corona virus

ज्या ठिकाणी कंटेंटमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांना प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार नाही, असे परब यांनी सांगितले आहे.

free bus service
राज्यातील घरवापसी
author img

By

Published : May 9, 2020, 3:17 PM IST

Updated : May 9, 2020, 6:06 PM IST

मुंबई - एकीकडे लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर राज्यातल्या मजुरांना आणि विद्यार्थ्यांनाही आपल्या गावी पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या सोमवारपासून एसटीच्या मोफत सेवेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

समूहाच्या माध्यमाने किंवा वैयक्तिकरीत्या सरकारची परवानगी घेऊनच प्रवाशांना आपल्या गावी जाता येणार आहे. एसटीचा वापर झाल्यानंतर त्या गाडीचे पूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येईल. तसेच प्रत्येक प्रवाशाला तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रवासादरम्यान खाण्या-पिण्याची व्यवस्था सरकार करणार नाही. प्रवाशांनी स्वतः आपली व्यवस्था करायची आहे, असेही परब यांनी स्पष्ट केले.

तसेच ज्या ठिकाणी कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांना प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार नाही. संबंधित विभागाचे पोलीस अधिकारी आणि संबंधित जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांची परवानगी प्रवाशांना घ्यावी लागणार आहे, परब यांनी सांगितले.

  • या प्रवासाबद्दल महत्वाच्या अटींवर एक नजर -
  1. सोशल डिस्टनसिंग नियमानुसार प्रत्येक सीटवर 1 प्रवासी यामुळे एका बसमध्ये साधारणपणे 21 ते 22 लोक बसू शकतात. त्यामुळे जर 21-22 लोकांचा एक ग्रुप तयार झाला, तर त्या ग्रुपने आपल्या ग्रुप लिडरच्या नावासह, सर्वांची नावे, संपूर्ण पत्ता, जिथे जायचे आहे तेथील पत्ता, आधार कार्ड नंबर असा फॉर्म भरून शहरी भागामध्ये पोलीस आयुक्त कार्यालय व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी/ तहसीलदारांकडे जमा करावेत. ज्या जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर त्यांना एसटी कधी व कोठून जाणार आहे, याबद्दलची माहिती कळविण्यात येईल.
  2. जे नागरिक वैयक्तिक जाऊ इच्छितात त्यांनी एसटी महामंडळाने तयार केलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारे नाव नोंदणी करायची आहे. हे पोर्टल सोमवारपासून चालू होईल. ऑनलाईन अर्ज करतेवेळी, आपण सध्या ज्या जिल्ह्यात वास्तव्य करत आहात, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची परवानगी जोडणे आवश्यक आहे.
  3. या प्रवासादरम्यान, प्रवाशांनी मास्क घालणे, बस मध्ये चढतेवेळी हात सनिट्झरने स्वच्छ करणे बंधनकारक आहे. बस निघण्यापूर्वी व पोहचल्यानंतर सॅनिटाईज केली जाईल.
  4. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रवासी जाणार आहेत तिथे त्यांची तपासणी करून संस्थात्मक किंवा घरीच विलगीकरण करण्याचे अधिकार त्या-त्या नोडल अधिकारी यांच्याकडे असतील.
  5. ही पॉईंट टू पॉईंट सेवा आहे. प्रवासात मध्येच कुठे प्रवासी उतरणार नाही किंवा चढणार नाहीत. लांब पल्याच्या गाड्या कुठेही जेवणासाठी थांबणार नाहीत, त्यामुळे आपले अन्नपाणी घरूनच घेऊन यावे, तसेच फक्त सॅनिटाईज केलेली महामंडळाचीच प्रसाधनगृहे वापरली जातील.
  6. कंटेटमेंट झोन मधील नागरिकांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.

Last Updated : May 9, 2020, 6:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.